अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन व कृषी क्र ांती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:28 PM2019-08-06T22:28:06+5:302019-08-06T22:28:50+5:30

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्र ांती योजना आणली आहे.

Agricultural Self-Help and Agricultural Revolution Scheme for Scheduled Tribe Farmers | अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन व कृषी क्र ांती योजना

अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन व कृषी क्र ांती योजना

googlenewsNext
ठळक मुद्देविहिरीसाठी अडीच लाख मिळणार : विद्युत जोडणी, सौरपंप, ठिबक सिंचनासाठीही निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्र ांती योजना आणली आहे. या योजनेत जुन्या व नवीन विहीरींसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती नवबौध्द व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा सातबारा व आठ-अ असणे आवश्यक असून वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांच्या वर नसावे. संबंधित शेतकऱ्याला सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ आॅगस्टपासून आॅनलाईन अर्ज घेण्यास सुरूवात झाली आहे. ४ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्रत कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडेही सादर करावयाची आहे. १०० टक्के अनुदानावर असलेल्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि सभापती नाना नाकाडे व कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप यांनी केले आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गतही नवीन विहिरीच्या अनुदानासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडे ०.४० ते ६ हेक्टर शेतजमीन असावी. इतर बाबींच्या लाभासाठी ०.२० हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी, अशी अट आहे.

असा मिळणार लाभ
या योजनेअंतर्गत नवीन विहिरीकरिता शेतकऱ्यांना अडीच लाख रु पये तर जुन्या विहीर दुरु स्तीकरीता ५० हजार रु पये, विद्युत जोडणीकरीता १० हजार रु पये, सौर कृषीपंप संचासाठी २० हजार रु पये, सुक्ष्म सिंचनास चालना देण्यासाठी ठिंबक सिंचन संचाकरिता ५० हजार रुपये, तुषार संचासाठी २५ हजार रु पये, तसेच शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

Web Title: Agricultural Self-Help and Agricultural Revolution Scheme for Scheduled Tribe Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.