कृषी गोदाम इमारत निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 05:00 AM2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:27+5:30

चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथील कृषी गोदाम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करून घ्यावे, असे निर्देश जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिले आहे. त्याअनुषंगाने कंकडालवार यांनी ९ ऑक्टोबर २०२० रोजी बीडीओंना पत्र पाठविले आहे. भेंडाळा येथील कृषी गोदामाचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरणाचे काम अपूर्ण आहे. विद्युकीणाचे काम पूर्ण करून हे गोदाम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करा.

Agricultural warehouse building unusable | कृषी गोदाम इमारत निरूपयोगी

कृषी गोदाम इमारत निरूपयोगी

Next
ठळक मुद्देवीज पुरवठ्याचा अभाव : भेंडाळा परिसरातील समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : शासनाच्या योजनेतून चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे अन्नधान्याची साठवणूक करण्याच्या उद्देशाने कृषी गोदाम इमारतीचे काम करण्यात आले. मात्र या इमारतीत वीज पुरवठा नसल्याने वर्षभरापासून कृषी गोदामाची ही इमारत निरूपयोगी ठरली आहे.
कृर्षी उत्पादनाच्या सुगीच्या काळात कमी बाजार भावाने होणाऱ्या विक्रीस आळा घालणे, पणन व्यवस्थेत शेतकऱ्याची पथ सुधारणा करून ग्रामीण भागातील शेतकरी व कृषी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच गोदामात साठविलेल्या शेतमालाच्या गोदाम पावतीवर वित्त पुरविण्यासाठी शासनाच्या वतीने कृषी गोदाम योजना कार्यान्वित करण्यात आली. शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सन २००१-०२ या वर्षीपासून महाराष्ट्रात गोदाम निमिर्तीची योजना हाती घेण्यात आली. त्याअनुषंगाने चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे कृषी गोदामाचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीत वीज पुरवठ्याची सुविधा नसल्याने मागील वर्षीपासून सदर गोदाम इमारत आपल्या ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कुचराई करीत आहेत.
त्यामुळे या परिसरातील शेतकरी आपला शेतमाल चामोर्शी कृषी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेऊन विकत आहे. भेंडाळा येथील कृषी गोदाम शेतकऱ्यासाठी उपलब्ध झाले असते तर भेंडाळा येथेच धान खरेदीची व्यवस्था झाली असती. शेतकऱ्यांना चामोर्शी येथे जावे लागले नसते. मात्र प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी भाड्यापोटी आर्थिक भुर्दंड बसत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सदर गोदामाचे बांधकाम खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात आले. विहित मुदतीत बांधकाम करून हे गोदाम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करणे अपेक्षित होते. मात्र या गोदामात अजुनही वीज मीटर लागला नाही. या गोदामामध्ये वीज मीटर लावून वीज पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे असते. मात्र ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठ्याच्या वीज देयकाची थकबाकी असल्यााने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाने डिमांड प्रलंबित ठेवली आहे.

जि.प. अध्यक्षांचे बीडीओंना निर्देश
चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथील कृषी गोदाम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करून घ्यावे, असे निर्देश जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिले आहे. त्याअनुषंगाने कंकडालवार यांनी ९ ऑक्टोबर २०२० रोजी बीडीओंना पत्र पाठविले आहे. भेंडाळा येथील कृषी गोदामाचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरणाचे काम अपूर्ण आहे. विद्युकीणाचे काम पूर्ण करून हे गोदाम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करा. शेतकऱ्यांकरीता हा गोदाम खुला करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल अवगत करावा, असे अध्यक्ष कंकडालवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

जोपर्यंत कृषी गोदाम सुसज्ज होऊन आम्हाला हस्तांतरीत होत नाही, तोपर्यंत या गोदामाची जबाबदारी आमची नाही. या गोदामामध्ये वीज मीटर बसविण्याची जबाबदारी जि.प.च्या बांधकाम उपविभाग चामोर्शी यांच्याकडे आहे.
- एम. के. काळबांधे, प्रशासक ग्रा.पं. भेंडाळा

Web Title: Agricultural warehouse building unusable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती