अहेरीतील समस्या जाणल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:41 PM2017-07-30T23:41:57+5:302017-07-30T23:42:14+5:30

जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी अहेरी नगर पंचायतीला शुक्रवारी आकस्मिक भेट देऊन शहरातील समस्या जाणून घेतल्या.

ahaeraitaila-samasayaa-jaanalayaa | अहेरीतील समस्या जाणल्या

अहेरीतील समस्या जाणल्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी घेतला आढावा : डम्पिंग यार्डसाठी जागा उपलब्ध देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी अहेरी नगर पंचायतीला शुक्रवारी आकस्मिक भेट देऊन शहरातील समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी कृष्णा रेड्डी, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, नगरसेवक गिरीष मद्देर्लावार, गिरीष मुक्कावार, शैलेंद्र पटवर्धन, नितीन दोंतुलवार, हर्षा ठाकरे, मालू तोडसाम, कबीर शेख, सचिन पेदापल्लीवार, श्रीनिवास मारगोनवार, दिलीप पडगेलवार, अमोल गुडेल्लीवार, गुड्डू ठाकरे, माया बिटपल्लीवार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी नगर पंचायतीचा विकास आराखडा, घरकूल योजना, पथदिवे यांची माहिती जाणून घेतली. शहरात वाढलेले अतिक्रमण, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांना देण्यात आली. अहेरी शहरातील कचरा टाकण्यासाठी डम्पिंग यार्डसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कचºयाचे विल्हेवाट करताना चांगलीच अडचण होते. त्यामुळे नगर पंचायतीला डम्पिंग यार्ड उपलब्ध करून द्यावे, शहरातील काही प्रभागामध्ये वाढीव नळ योजना, आवश्यक ठिकाणी हातपंप, नो पार्र्किंग झोन, नगर पंचायतसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी हस्तांतरण, अग्नीशमन बंब, जुन्या नगर पंचायतीचे गाळे तोडून नवीन गाळे बांधणे, अहेरी उपजिल्हा रूग्णालयात स्थायी रक्तपेढी उभारणे, अहेरी-खमनचेरू नवीन रस्ता बांधणे आदी समस्या जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिल्या. या समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले.

Web Title: ahaeraitaila-samasayaa-jaanalayaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.