अहेरीला मिळाली सुसज्ज बाजारवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:14 PM2018-08-12T23:14:55+5:302018-08-12T23:15:19+5:30

शहरवासीयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोयीयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोत्थान विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला १ कोटी ५० लक्ष रुपये सुसज्ज बाजारवाडीच्या बांधकामासाठी मंजूर केले.

Aheri got a well-stocked marketplace | अहेरीला मिळाली सुसज्ज बाजारवाडी

अहेरीला मिळाली सुसज्ज बाजारवाडी

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : दीड कोटी रूपयांचा निधी विकासकामांवर खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : शहरवासीयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे अहेरी शहरात सर्व सोयीयुक्त बाजारवाडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत नगरोत्थान विकास योजनेतून अहेरी नगर पंचायतला १ कोटी ५० लक्ष रुपये सुसज्ज बाजारवाडीच्या बांधकामासाठी मंजूर केले. या निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडी मधील विविध विकासकामे पूर्ण झाले. त्या विकासकामांचे नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
१.५ कोटी रुपयांच्या निधीतून अहेरी शहरातील बाजारवाडीचे रूप पालटले असून बाजारवाडीत भाजीपाला व इतर विक्रेत्यांसाठी सुसज्ज ओटे बांधण्यात आले आहेत. तसेच बाजारवाडीत अंतर्गत सिमेंट रस्ते व नालीचेही बांधकाम करण्यात आले आहे. सर्व विक्रेत्यांना लाईटची व इतर सर्व प्रकारच्या सोयी याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांना व लोकांसाठी सोय होणार आहे.
लोकार्पण कार्यक्रमाला जि. प. समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, उपाध्यक्ष कमल पडगेलवार, उपविभागीय अभियंता (बांधकाम) मेश्राम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार, नगर पंचायत सभापती नारायण सिडाम, सुवर्णा येमुलवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, पप्पू मद्दीवार, शंकर मगडीवार, सरफराज आलम, सचिन पेद्दापल्लीवार, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार, संतोष येमुलवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
११ वॉर्डांमध्ये लागले हायमास्ट
अहेरी शहरातील अनेक प्रभागात अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे त्याठिकाणी हायमास्ट लाईट लावण्याची लोकांची मागणी होती. याची दखल घेत अहेरी नगर पंचायततर्फे महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून ३० लक्ष रुपये खर्च करून शहरातील विविध प्रभागात ११ हायमास्ट लाईट लावण्यात आले होते. त्याचेही लोकार्पण पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामुळे शहरातील अंधाराचे साम्राज्य संपुष्टात येणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Aheri got a well-stocked marketplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.