अहेरी राजमहालात इफ्तार पार्टी
By admin | Published: July 7, 2016 01:36 AM2016-07-07T01:36:31+5:302016-07-07T01:36:31+5:30
पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव सर्वत्र रोजा ठेवून आत्मशुद्धीसाठी प्रार्थना करतात. या निमित्ताने सर्वधर्म समभाव म्हणून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते.
सर्वधर्म समभावाचा संदेश : बहुसंख्य मुस्लीम बांधव उपस्थित
अहेरी : पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव सर्वत्र रोजा ठेवून आत्मशुद्धीसाठी प्रार्थना करतात. या निमित्ताने सर्वधर्म समभाव म्हणून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यानुसारच परंपरेनुसार अहेरी येथील राजमहालात राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यातर्फे मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मस्जीदचे अध्यक्ष रिझवान शेख, भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अब्बास बेग, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख, मस्जीद कमिटीचे सदस्य अरवबाबू, पोलीस निरीक्षक मोरे, अहम्मद इशाक, मस्जीदचे आलीम, इरफान पठाण, निसार सय्यद, पाणबुडे व मुस्लीम समाजासह इतर समाजातीलही बांधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी समाजबांधवांनी विविध समस्यांवर चर्चा केली. इफ्तार पार्टीद्वारे सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)