अहेरी-सिरोंचा मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:08+5:302021-07-04T04:25:08+5:30
दरवर्षी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. दुरुस्तीच्या नावाखाली आजूबाजूचे गोल-गोल दगड ...
दरवर्षी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. दुरुस्तीच्या नावाखाली आजूबाजूचे गोल-गोल दगड उचलून खड्डे थातूरमातूर भरले जातात. वरून मुरूम टाकला जातो. त्यामुळे सदर दगड पहिल्याच पावसात बाहेर येतात. परिणामी चारचाकी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या दयनीय अवस्थेची कल्पना असूनही दुर्लक्ष होताना दिसते. या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला मंजुरी असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. यावर्षी रेपनपल्ली ते उमानूरदरम्यान अनेक खड्डे बुजविले सुद्धा नाहीत. सध्या या रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे काही कळेनासे झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा पूर्ण पावसाळ्यादरम्यान अनेक दुर्घटना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फोटो सेंड केला आहे