आलापल्ली आरोग्यवर्धिनी केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:25 AM2021-06-10T04:25:08+5:302021-06-10T04:25:08+5:30
आलापल्ली पीएचसीअंतर्गत वेलगूर, किस्टापूर, पुसूकपल्ली, नागेपली, मलमपल्ली, तोंदेल, येलचिल, आदी गावे येतात; मात्र या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे ...
आलापल्ली पीएचसीअंतर्गत वेलगूर, किस्टापूर, पुसूकपल्ली, नागेपली, मलमपल्ली, तोंदेल, येलचिल, आदी गावे येतात; मात्र या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत हाेता. राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला आठ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या. त्यामुळे आलापल्ली प्राथमिक आराेग्य केंद्राला एक रुग्णवाहिका देण्यात आली. आलापली येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात रुग्णवाहिकेचे लाेकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच शंकर मेश्राम, जिल्हा परिषदेचे सदस्य अजय नैताम, पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसरपंच विनोद अकनपलीवार, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल श्रीरामवार, ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर रामटेके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका उईके, औषधनिर्माण अधिकारी सिद्धार्थ नरहरी, आरोग्यसेवक दत्तू मडावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संबोधी मेश्राम, आरोग्यसेविका कोसनवार, वनिता जुमनाके, वाहनचालक सत्यनारायण लेकूर, दीपक कुसनाके, नीता उरेते व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.