दारू व तंबाखूमुक्त गावासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:37 AM2021-04-08T04:37:28+5:302021-04-08T04:37:28+5:30

कार्यशाळेत दारूबंदी कायदा, तंबाखूबंदी कायद्यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. तसेच गावात उद्धवणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. ग्रामपंचायत दारू व तंबाखूमुक्त ...

For alcohol and tobacco free village, G.P. Initiative of office bearers | दारू व तंबाखूमुक्त गावासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

दारू व तंबाखूमुक्त गावासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

Next

कार्यशाळेत दारूबंदी कायदा, तंबाखूबंदी कायद्यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. तसेच गावात उद्धवणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. ग्रामपंचायत दारू व तंबाखूमुक्त राहणे का आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी दारू व तंबाखूमुक्त गावाचे वचन दिले होते. त्याची वचनपूर्ती करणे, कोरोना काळात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यामुळे विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गावातून तंबाखू हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध दारूविक्री सुरू असल्यास त्यांना नोटीसच्या माध्यमातून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन करणे, दारूबंदी असून तंबाखूविक्री सुरू असल्यास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करणे. गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री बंद झाल्यास गावाचा विकास होणार, याबाबत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात कढोली, सोनेरांगी, भगवानापूर, सावरखेडा, खरकाडा, शिरपूर आदी ६ ग्रामपंचायतमधील ११ पदाधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी मुक्तिपथ प्रतिनिधी दीक्षा सातपुते, भारती उपाध्ये, राहुल कुंभलवार यांनी सहकार्य केले.

Web Title: For alcohol and tobacco free village, G.P. Initiative of office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.