गडचिरोलीत सापडली हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:57 PM2018-01-08T19:57:27+5:302018-01-08T19:59:09+5:30

स्थानिक गुन्हे शाखेतील दारूबंदी पथकाने रविवारी रात्री कोरची तालुक्यातील कुमकोट या गावातील सुखदेव कल्लो याच्या घरी धाड टाकून सुमारे ५९ लाख ४० हजार ५० रूपयांची दारू जप्त केली आहे.

Alcohol of Haryana and Madhya Pradesh found in Gadchiroli | गडचिरोलीत सापडली हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील दारू

गडचिरोलीत सापडली हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील दारू

Next
ठळक मुद्देपोलीसही आश्चर्यचकितकुमकोट गावात ६० लाखांचा दारूसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेतील दारूबंदी पथकाने रविवारी रात्री कोरची तालुक्यातील कुमकोट या गावातील सुखदेव कल्लो याच्या घरी धाड टाकून सुमारे ५९ लाख ४० हजार ५० रूपयांची दारू जप्त केली आहे. यातील बहुतांश दारू मध्यप्रदेश व हरियाणा राज्यातील असल्याचे आढळले. हरियाणाची दारू बघून पोलीसही अवाक् झाले.
कोरची येथील दारू विक्रेता निर्मल धमगाये हा मध्यप्रदेश व हरियाणा राज्यातून दारू आणून ती कुमकोट गावातील सुखदेव कल्लो याच्या घरी ठेवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाला प्राप्त झाली. पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडगे यांनी पोलीस पथकासह सुखदेव कल्लो याच्या घराची तपासणी केली असता, घरात ५९ लाख ४० हजार ५० रूपयांची दारू आढळून आली.
दारू जप्त करून बॉटलची तपासणी केली असता, बहुतांश दारूवर मध्यप्रदेश व हरियाणा राज्यातील दारू निर्मितीचे ठिकाण लिहिले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होण्याच्या पूर्वी बहुतांश दारू चंद्रपूर जिल्ह्यातूनच आणली जात होती. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारू पुरवठादारांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा व छत्तीसगड या राज्यातून दारुआणण्यास सुरूवात केली होती. पहिल्यांदाच हरियाणा राज्यातील दारू सापडली आहे. हरियाणातून दारू आणण्यासाठी मध्यप्रदेश, राजस्थान या दोन राज्यांच्या सीमा पार कराव्या लागतात. गडचिरोली पासून या राज्याचे अंतर सुमारे एक हजार किमी आहे. एवढ्या दूरचा पल्ला गाठून दारू आणली गेली. यावरून यामध्ये मोठे रॉकेट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने गडचिरोली पोलीस तपास करीत आहेत. कोरची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Alcohol of Haryana and Madhya Pradesh found in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे