वाघाची शिकार केल्याप्रकरणी सर्व आरोपींना १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी

By गेापाल लाजुरकर | Published: August 2, 2023 08:09 PM2023-08-02T20:09:37+5:302023-08-02T20:10:06+5:30

गडचिरोली तालुक्याच्या आंबेशिवणी जंगल परिसरात आरोपींनी दोन वाघांची शिकार केली होती.

All accused in tiger poaching case remanded in judicial custody till 14 | वाघाची शिकार केल्याप्रकरणी सर्व आरोपींना १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी

वाघाची शिकार केल्याप्रकरणी सर्व आरोपींना १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी

googlenewsNext

गडचिरोली : तालुक्याच्या आंबेशिवणी येथील जंगलात दोन वाघांची शिकार प्रकरणात अटकेत असलेल्या बावरिया जमातीच्या ११ आरोपींना न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावली होती. बुधवारी पुन्हा त्या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

तालुक्याच्या आंबेशिवणी जंगल परिसरात आरोपींनी दोन वाघांची शिकार केली होती. सदर प्रकरणात दोनपेक्षा अधिक वाघांची शिकार झाल्याचा संशय आहे. त्यानुसार सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात आरोपींची चौकशी सुरू होती. यासाठी आरोपींना २ ऑगस्टपर्यंत वन कोठडी मागितली होती. वन कोठडी संपल्यानंतर ११ आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, दोन महिला आरोपी ९ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
दरम्यान, व्याघ्र शिकार प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच मोठी गोपनीयता बाळगली आहे. एकवेळा वाढीव कोठडी घेतली; पण तपासात ठोस काही हाती लागले नाही. त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांना विचारले असता, सखोल चौकशी सुरू आहे. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अधिक माहिती देऊ, असे सांगितले. तपास अधिकारी व सहायक वनसंरक्षक सोनल भडके हे तर भ्रमणध्वनीही घ्यायला तयार नाहीत.

Web Title: All accused in tiger poaching case remanded in judicial custody till 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.