कुपोषण मुक्तीसाठी सर्व विभाग एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:10 AM2018-09-05T01:10:08+5:302018-09-05T01:11:09+5:30

लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच किशोरवयीन मुलामुलींचेही आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी सप्टेंबर महिन्यात संपूर्ण महिनाभर जनजागृती करण्याच्या सूचना सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच विभाग यादृष्टीने कामाला लागले आहेत.

All departments concentrated for malnutrition relief | कुपोषण मुक्तीसाठी सर्व विभाग एकवटले

कुपोषण मुक्तीसाठी सर्व विभाग एकवटले

Next
ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये महिनाभर जनजागृती : शाळा व आरोग्य विभागांचा पुढाकार

अरविंद घुटके।
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हाळा/मोहटोला : लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच किशोरवयीन मुलामुलींचेही आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी सप्टेंबर महिन्यात संपूर्ण महिनाभर जनजागृती करण्याच्या सूचना सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच विभाग यादृष्टीने कामाला लागले आहेत.
राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. १ ते ३० सप्टेंबर हा कालावधी ‘पोषण महिना’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे या मोहिमेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शाळा, महाविद्यालये, आरोग्य विभाग, आशा वर्कर, परिचारिका, ग्रा.पं.सदस्य यांच्या वतीने जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायत सदस्याकडे गावातील मुलीचे लग्न १८ वर्षांपेक्षा कमी वयात होणार नाही. याकडे लक्ष घालयाचे. त्याचबरोबर गरोदर मातेची प्रसूती रुग्णालयातच होईल, उघड्यास शौचास होणार नाही. प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय उपलब्ध करून देऊन त्याचा वापर करायला लावणे, घराभोवती फळझाडे, भाजीपाला लावण्यासाठी प्रोत्साहित करणे, ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अंगणवाडी कार्यकर्तीकडे सर्वांगिण पोषणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुलांचे नियमित आणि पूर्ण लसीकरण करणे, शारीरिक आणि बौद्धीक विकासाकडे लक्ष देणे, गरोदर माता व मुलांची काळजी घेणे आदी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. आशा कार्यकर्तीकडे गरोदर मातांची रुग्णालयातच प्रसूती करून घेणे, लहान बाळाची देखभाल व बाळंतकाळात गरोदर मातेवर लक्ष ठेवणे, बालकाचे नियमित व पूर्ण लसीकरण करणे ही जबाबदारी दिली आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडे किशोरवयीन मुला, मुलींचा एनिमियापासून बचाव करणे, मुलांना स्वच्छतेबाबत जागृती करणे आदी जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या वतीने गावात रॅली काढून पोषण आहाराबाबत जनजागृती केली जात आहे.
गरोदर व बाळंत महिलांनी घ्यावयाची काळजी
गरोदर मातेने लोह व जीवनसत्व युक्त पोष्टीक आहार घ्यावा, पोष्टीक असलेले दूध तसेच आयोडिनयुक्त मीठ खावे, आयएफएची लाल गोळी चवथ्या महिन्यापासून १८० दिवसांपर्यंत दररोज खावी, कॅल्शियमची ठराविक मात्रा घ्या, एक एल्बेंडाजोलची गोळी दुसºया तिमाईत घ्या. उंच जागी झाकून ठेवलेले शुद्ध पाणी प्यावे, प्रसूती आदी कमीत कमी चार एएनसी तपासण्या परिचर किंवा डॉक्टरकडून करून घ्याव्या, जवळच्या रुग्णालयातच प्रसूती करावी, स्वच्छतेची काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
४बाळंत महिलांनी लोह व जीवनसत्व युक्त आहार घ्यावा. बाळंत झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत दररोज आयएफएची एक लाल गोळी घ्यावी, जन्मानंतर बाळाला एका तासाच्या आतच अंगावरचे दूध पाजणे सुरू करावे, आईचे पहिले पिवळे दूध बालकासाठी पहिल्या लसीसारखे असते. सहा महिन्यापर्यंत दूध पाजावे, स्वत:च्या आणि आपल्या बालकाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी आदींबाबत जनजागृती केली जाणार आहे. परिचारिका, आशा कार्यकर्ती घरी जाऊन याबाबतची माहिती बाळंत मातेला देणार आहे.

Web Title: All departments concentrated for malnutrition relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.