हनुमान वाॅर्डातील दुर्गंधीयुक्त नाली दुरुस्तीची पालिकेला ॲलर्जी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:36 AM2021-04-27T04:36:54+5:302021-04-27T04:36:54+5:30
देसाईगंज शहराच्या सर्वांगीण विकासाचा सत्ताधाऱ्यांकडून ढोल पिटला जात असला तरी शहरातील सर्वांत जुन्या वसाहतीचा हा भाग एकदाही विकसित करावा, ...
देसाईगंज शहराच्या सर्वांगीण विकासाचा सत्ताधाऱ्यांकडून ढोल पिटला जात असला तरी शहरातील सर्वांत जुन्या वसाहतीचा हा भाग एकदाही विकसित करावा, असे येथील लाेकप्रतिनिधी व प्रशासनाला वाटले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त हाेत आहे. मागील अनेक वर्षांपासून हनुमान वाॅर्डातील दुर्गंधीयुक्त नाली येथील नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. जागोजागी फुटलेल्या नालीला घुशींनी पोखरल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचून राहात आहे.
अनेकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. नालीची साफसफाई करण्यासोबतच नव्याने बांधकाम करण्यासंदर्भात वाॅर्डाचे नगरसेवक दीपक झरकर यांना येथील नागरिकांनी वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
बाॅक्स
..तर नगरसेवकाला फिरू देणार नाही
नालीची दुरुस्ती हाेत नसल्याने पालिका प्रशासनाच्या भोंगळ व मनमानी कारभाराप्रति तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. नालीतील दुर्गंधीमुळे राेगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नालीची सफाई करून नव्याने बांधकाम करावे, अन्यथा नगरसेवकाला वाॅर्डात फिरू देणार नाही, असा इशारा वाॅर्डातील राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष भुवन लिल्हारे, सेवानिवृत्त तहसीलदार प्रदीप लाडे, दिनकर रामटेके, अभिषेक मेश्राम, चिराग भागडकर यांनी दिला आहे.
===Photopath===
250421\25gad_8_25042021_30.jpg
===Caption===
दुरवस्थेत असलेली हनुमान वाॅर्डातील नाली.