७६ कोटींचे पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:01 AM2019-07-25T00:01:57+5:302019-07-25T00:03:18+5:30
खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे. शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे सुद्धा खरेदी करावे लागतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे.
शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे सुद्धा खरेदी करावे लागतात. या सर्व बाबींवर हजारो रुपयांचा खर्च होतो. एवढा पैसा शेतकºयाकडे राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज काढावे लागत होते. सावकाराकडून मागितलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याजदर आकारला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत होता. कधीकधी कर्जापाई आत्महत्याही करावी लागत होती. शेतकºयाला सावकाराच्या पाशातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पीक कर्ज ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बँकांनी शेतकºयांना कर्ज द्यावे, यासाठी प्रत्येक बँकेला कर्ज देण्याची सक्ती करण्यात आली आहे.
२०१९ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. काही शेतकºयांनी खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच कर्जाची उचल केली आहे तर काही शेतकरी अजूनही कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. २२ जुलैपर्यंत १८ हजार ५१३ शेतकºयांना बँकांनी ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८.३३ कोटी रुपये कर्जाचे वितरण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. काही गावांना बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी ५० किमी अंतर गाठावे लागते. कर्जाची केस मंजूर करण्यासाठी आठ दिवस फेºया झाल्यास शेतकºयाचे हजारो रुपये खर्च होतात. तसेच ये-जा करण्याची सुविधा नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले शेतकरी कर्ज घेण्यास तयार होत नाही. परिणामी बँकांना दिलेल्या उद्दिष्टाएवढे कधीच कर्ज वितरण होत नाही.
कर्जमाफीअभावी नवीन कर्जाची उचल थांबली
दोन वर्षांपूर्वी शासनाने कर्जमाफी केली. याचा लाभ अजूनही काही शेतकºयांना मिळाला नाही. जुने कर्ज कायम असल्याने नवीन कर्ज बँका देण्यास तयार होत नाही. कर्ज माफ होईल, या अपेक्षेने शेतकरी सुद्धा कर्ज भरत नाही. परिणामी मागील दोन वर्षांपासून कर्ज उचलणाºया शेतकºयांची संख्या घटली आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्याच शेतकºयांनी कर्जाची उचल केली आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश बँकांना असले तरी बँकाही फारसा पुढाकार घेत नाही.
सहकारी बँकेतर्फे ४४ कोटींचे कर्ज वितरण
कर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आघाडी घेतली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात ५० पेक्षा अधिक शाखा आहेत. यातील बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागात आहेत. त्यामुळे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. सहकारी बँकेला यावर्षीच्या खरीप हंगामात ५५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४४ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. बँकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या ७९.९१ टक्के कर्ज वितरण झाले आहे. पुन्हा कर्ज वाटप वाढण्याची शक्यता आहे.