जीवनावश्यक साहित्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:00 AM2018-11-07T01:00:21+5:302018-11-07T01:01:35+5:30

प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अपर पोलीस अधीक्षक बन्सल, जिमलगट्टाचे उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने रविवारी दामरंचा येथे जनजागरण मेळावा घेऊन ‘यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत’ हा उपक्रम राबविण्यात आला.

Allocation of living material | जीवनावश्यक साहित्यांचे वाटप

जीवनावश्यक साहित्यांचे वाटप

Next
ठळक मुद्देदामरंचात जनजागरण मेळावा : नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अपर पोलीस अधीक्षक बन्सल, जिमलगट्टाचे उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने रविवारी दामरंचा येथे जनजागरण मेळावा घेऊन ‘यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत’ हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान यावेळी नागरिकांना विविध जीवनावश्यक साहित्यांचे वितरण पोलीस विभागातर्फे करण्यात आले.
सोशल मिडियाचा वापर करून ‘यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत’ या कार्यक्रमाचा प्रचार करून एनएसएस टीम, एसआयटीएस टीम, आठवण ग्रुप/ बिर्इंग ह्यूमन व इतर मदतगारांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात साहित्य जमा करण्यात आले. यात २५ मोठे गंजाचे सेट, स्पोर्ट्स साहित्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या हस्ते सदर कार्यक्रमात २६ गावांना हे साहित्य वाटप करण्यात आले.
नक्षलवाद्यांच्या पोकळ धमक्यांना न जुमानता उप पोलीस स्टेशन दामरंचा हद्दीतील जवळपास सहा ते सात हजार आदिवासी नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य राकेश पनेला, कुरुमपल्लीच्या सरपंच मैनी तलांडी, मनेराजारामचे सरपंच रंगया मडावी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड उपस्थित होते.
यावेळी संतोष गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या योजना, सोयीसुविधा तसेच आत्मसमर्पण योजनेची माहिती दिली. आठवण ग्रुप (पुणे) च्या सदस्यांनी आदिवासी बांधवांसाठी ‘बहार, ए-जशन आदिवासी’ या कार्यक्रमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमातून आदिवासी बांधवांना स्वातंत्र्य, समता व आपल्या अधिकारांची जाणीव करून दिली. तसेच आविष्कार अकॅडमी व पोलीस मित्र परिवार पुणे यांनी व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचा संदेश यातून दिला. या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली होती. सदर मेळाव्याचे संचालन पोलीस उपनिरीक्षक पडळकर यांनी तर आभार प्रभारी अधिकारी गणेश मोरे यांनी मानले.

Web Title: Allocation of living material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.