दामदुप्पट किंमत मोजणाऱ्या शेतकऱ्यांनाच युरियाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:25 AM2019-10-08T00:25:37+5:302019-10-08T00:26:00+5:30

पॉस मशीनच्या सहाय्यानेच युरियाची विक्री करणे आवश्यक असताना पॉस मशीनचा वापर न करताच दामदुप्पट भाव देण्यास तयार होणाºया शेतकऱ्यालाच खतविक्रेते युरियाची बॅग उपलब्ध करून देत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लुट सुरू असताना कृषी विभाग मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

Allocation of urea only to farmers who pay double price | दामदुप्पट किंमत मोजणाऱ्या शेतकऱ्यांनाच युरियाचे वाटप

दामदुप्पट किंमत मोजणाऱ्या शेतकऱ्यांनाच युरियाचे वाटप

Next
ठळक मुद्देकृषी विभाग सुस्त : जिल्हाभरात तुटवड्याची स्थिती कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने खत विक्रेते बेभाव दराने युरियाची विक्री करीत आहेत. तरीही कृषी विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पॉस मशीनच्या सहाय्यानेच युरियाची विक्री करणे आवश्यक असताना पॉस मशीनचा वापर न करताच दामदुप्पट भाव देण्यास तयार होणाºया शेतकऱ्यालाच खतविक्रेते युरियाची बॅग उपलब्ध करून देत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लुट सुरू असताना कृषी विभाग मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
दोन महिने सतत पाऊस पडल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. शेतकऱ्यांनी धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांच्या निंदण व मशागतीला सुरूवात केली. निंदणाचे काम आटोपल्यानंतर शेतकरी पिकांना खत देतात. त्यामुळे युरिया खताची अचानक मागणी वाढली. हे जरी कारण असले तरी यावर्षी युरियाचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आहे, हे सुद्धा मुख्य कारण आहे. जिल्हाभरातील काही निवडकच खतविक्रेत्यांकडे युरियाचा साठा उपलब्ध आहे. याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. युरियाच्या बॅगच्या अधिकृत किंमत २६७ रुपये आहे. असे असतानाही ४०० ते ५०० रुपये दराने विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे युरियाची बॅग शेतकºयांना स्वस्तदरात मिळावी, यासाठी शासन खत विक्रेत्या कंपन्यांना अनुदान देते. अनुदानाचा पैसा कंपन्या लाटत आहेत. तर अतिरिक्त दराने युरियाची विक्री करून व्यापारी गब्बर होत चालले आहेत.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत असतानाही कृषी विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे अजूनपर्यंत एकाही खत विक्रेत्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे खतविक्रेते व कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये साटेलोटे आहे की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Allocation of urea only to farmers who pay double price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी