२०० जणांना ब्लॅकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:00 AM2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:38+5:30
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सालईटोला या गावात ९ फेब्रुवारी रोजी रविवारला कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना ब्लॅकेटच्या रूपात मायेची ऊब देण्यात आली. गावातील २०० महिला व पुरूषांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सालईटोला या गावात ९ फेब्रुवारी रोजी रविवारला कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना ब्लॅकेटच्या रूपात मायेची ऊब देण्यात आली. गावातील २०० महिला व पुरूषांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, योगेश कुडवे, संदीप दुधबळे, सुभाष ठाकरे, नीलकंठ मेश्राम, अमोल मेश्राम, राहुल सोरते, त्र्यंबक खरकाटे, किशोर गेडाम, संजय बोबाटे, किसन बावणे, भास्कर मोहुर्ले, बंडू वासेकर आदी उपस्थित होते.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी संकल्पना शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असून सामाजिक दृष्टिकोन बाळगत शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप, गरजू शेतकऱ्यांना लागवडीसाठी मदत, सायकल स्पर्धा व इतर उपक्रम घेतले जातात.
सदर कार्यक्रमादरम्यान अरविंद कात्रटवार यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. शिवसैनिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे कात्रटवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित भांडेकर, छोटू वासनिक, प्रकाश वासाळे, कैलास जुआरे, अजय कांबळे, प्रशांत लटारे, हेमंत बारसागडे, दामोधर नांदेकर, चंद्रभान नांदेकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सालईटोला गावातील व परिसरातील नागरिकांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.