१२ शेतकºयांना बैलजोडी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 09:59 PM2017-09-02T21:59:06+5:302017-09-02T21:59:20+5:30

अहेरी येथील दानशूरचा राजा गणेश मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यावर्षी अभिनव व सामाजिक उपक्रम राबवून १२ गरजू व गरीब शेतकºयांना मोफत बैलजोडी व गायींचे वाटप केले.

Allotment of ball bearing jam to 12 farmers | १२ शेतकºयांना बैलजोडी वाटप

१२ शेतकºयांना बैलजोडी वाटप

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : अहेरी दानशूर गणेश मंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी येथील दानशूरचा राजा गणेश मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यावर्षी अभिनव व सामाजिक उपक्रम राबवून १२ गरजू व गरीब शेतकºयांना मोफत बैलजोडी व गायींचे वाटप केले.
बैलजोडी वाटपाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, विश्वहिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष गोविंद शेंडे, सनद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अहेरी येथील दानशूर राजा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. गणरायाच्या प्रतिष्ठापणेदरम्यान १० दिवस धार्मिक उत्सवांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
देशाची अर्थव्यवस्था बळकट होत चालली असली तरी शेतकºयांची आर्थिक परिस्थिती मात्र बेताची बनत चालली आहे. शेती कसण्यासाठी बैलजोडी हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मात्र बैलजोडी नसल्याने शेती कसणे शक्य होत नाही.
गणेशोत्सवादरम्यान लाखो रूपयांचा खर्च केला जातो. काही खर्च अनावश्यकही राहतो. अहेरी येथील दानशूराचा गणेश मंडळाने यावर्षी अनावश्यक खर्चाला आळा घालून वाचलेल्या पैशातून १२ बैलजोड्या व दोन गायी खरेदी केल्या. सदर बैलजोड्या व गायी शेतकºयांना वितरित केल्या. गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविल्याने दानशूर राजा गणेश मंडळाच्या सदस्यांची कौतुक केले जात आहे. प्रास्ताविक प्रविण पुल्लुरवार, संचालन पूर्वा दोंतुलवार तर आभार गुडेल्लीवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रवी नेलकुद्री, नितीन दोंतुलवार, विनोद जलेला, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक अमित बेझलवार, दिगु खतवार, पवन दोंतुलवार, श्रीनिवासी भंडारी, संतोष मंचालवार आदींनी सहकार्य केले.

मान्यवरांनी केले उपक्रमाचे कौतुक
बैलजोडी वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह विश्वहिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैलजोडी वाटपाच्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, दानशूर राजा गणेश मंडळाचा उपक्रम राज्यात आदर्श निर्माण करणारा आहे. बैलजोडीचे वाटप करून शेतकºयांना आधार दिला आहे. तर वृध्द नागरिकांना चष्म्यांचे वाटप करून नवी दृष्टी प्रदान केली आहे, असे गौरवोद्गार काढले. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, सनद गुप्ता यांनी सुध्दा कौतुक केले.

Web Title: Allotment of ball bearing jam to 12 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.