गरजूंना काँग्रेसतर्फे वस्तू वाटप

By admin | Published: June 20, 2016 01:14 AM2016-06-20T01:14:25+5:302016-06-20T01:14:25+5:30

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील वृद्धाश्रम तसेच खरपुंडी येथे गरजूंना विविध वस्तूंचे वाटप रविवारी करण्यात आले.

Allotment of goods by the Congress to the needy | गरजूंना काँग्रेसतर्फे वस्तू वाटप

गरजूंना काँग्रेसतर्फे वस्तू वाटप

Next

वृद्धाश्रम व खरपुंडीत कार्यक्रम : विद्यार्थ्यांनाही दिले साहित्य; परिसरात वृक्षारोपण
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील वृद्धाश्रम तसेच खरपुंडी येथे गरजूंना विविध वस्तूंचे वाटप रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही वितरित करण्यात आले.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या अध्यक्षतेखाली वृद्धाश्रमात पार पडलेल्या कार्यक्रमात वृद्धांना ब्लँकेट व मच्छरदाणीचे वितरण करण्यात आले. तसेच खरपुंडी येथे शालेय विद्यार्थ्यांना छत्री, नोटबुक व साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला.
दोन्ही कार्यक्रमाला माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, युवा नेते पंकज गुड्डेवार, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, समशेर खॉ पठाण, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमोल भडांगे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष नंदू वाईलकर, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, देवाजी सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय धकाते, कुणाल पेंदोरकर,गौरव अलाम, राकेश गणवीर, विवेक घोंगडे, कमलेश खोब्रागडे, राजू आखाडे, विजय बारापात्रे, अभिजित धाईत, डोनूजी नैताम, आनंदराव नैताम, श्यामराव उसेंडी, प्रकाश मोहुर्ले, हेमंत मोहितकर, तुषार कांबळे, तुषार कुळमेथे, रोहित सादुलवार, वृषभ धुर्वे, सचिन राठोड, क्रिष्णा जाधव, संघर्ष निकोडे, अरविंद मरापे, कालिदास जेंगठे, हेमंत भांडेकर, कैलाश शेंडे, विजय निकोडे व खरपुंडी येथील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Allotment of goods by the Congress to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.