जिल्ह्यातील लहान दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:07+5:302021-05-29T04:27:07+5:30
जिल्ह्यातील छोटी दुकाने बंद असल्याने दुकानदारांचा जगण्यासाठी असलेला आधारच जणू हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे छोटे दुकानदार मानसिकदृष्ट्या खचत ...
जिल्ह्यातील छोटी दुकाने बंद असल्याने दुकानदारांचा जगण्यासाठी असलेला आधारच जणू हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे छोटे दुकानदार मानसिकदृष्ट्या खचत आहेत. ग्रामीण भागातून शहरात येऊन अनेकांनी छोटी दुकाने सुरू केली आहेत. यासाठी त्यांनी बँक व इतरांकडून उसनवारीने पैसे घेतले आहेत. छोट्या दुकान चालकांना रिकाम्या हाताने राहावे लागत असल्याने घरखर्च, खोली भाडे आदी देण्याचे अडले आहे. यातून कुटुंबात वादविवाद सुरू झाले असल्याने त्यांचा मुलाबाळांवर परिणाम होत आहे. यातून एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. नोंदणीकृत दुकानांना दिलेली सवलत अनोंदणीकृत छोट्या दुकान चालकांनाही देण्यात यावी, अशी मागणी सुरावार यांनी खासदार नेते यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
===Photopath===
270521\3634img-20210412-wa0121.jpg
===Caption===
जिल्ह्यातील छोट्या दुकानदारांना सवलत द्या संतोष सुरावार यांचे फोटो