वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:17 IST2019-05-22T22:03:24+5:302019-05-22T22:17:42+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गुरुवारी (दि.२३) प्रचंड गर्दी होणार आहे. प्रत्येकजण वाहनाने येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले असून शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गुरुवारी (दि.२३) प्रचंड गर्दी होणार आहे. प्रत्येकजण वाहनाने येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले असून शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मतमोजणी प्रक्रिया व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीे नियोजन करण्याचे निर्देश दिले त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील वाहतुकीचे नियोजन केले आहे. स्ट्राँग रुमपासून १०० मीटर परिसरात कोणत्याही रस्त्यावर मोटारवाहन पार्किंग करता येणार नाही. शास्त्री चौकापासून गांधी चौक वरठी व बायपास रोडकडे जाणाºया रस्त्यावर बॅरिकेडस् उभारण्यात येणार आहेत. मात्र हे रस्ते सर्व प्रकारच्या रहदारीसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.
या मार्गाचा करा वापर
शहरातील शास्त्री चौकातून जाणारे अवजड वाहनाची वाहतूक नागपूर नाका, अशोका बार रिंगरोड, शास्त्री चौक, वरठीकडे. रामटेक कडून खात रोड मार्गे भंडारा व तुमसरकडे
गोंदियाकडून राष्ट्रीय महामार्गाहून भंडारामार्गे तुमसरकडे येणारी अवजड वाहने अशोकाबार, रिंगरोड, शास्त्री चौक वरठीकडे.
भंडारा शहरातील बसवाहतूक पुढीलप्रमाणे - बसस्थानक- मुस्लिम लायब्ररी चौक - साठे चौक - गांधी चौक - शास्त्री चौक - वरठीकडे व परतीचा मार्ग विरुध्दक्रमाणे