किराणा महागला तरी शहरात भाेजनाचे दर सध्या स्थिरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:43+5:30

काेराेनाची दुसरी लाट आटाेक्यात आल्यानंतर भाेजनालयाच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली हाेती. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही जुन्या दरात ग्राहकांना भाेजन उपलब्ध करून देणे थाेडेसे कठीण झाले आहे. सरकारने खाद्यतेल व किराणा साहित्याच्या किमती येत्या काही दिवसांत कमी न केल्यास नाईलाजास्तव आम्हांला शाकाहारी व मांसाहारी भाेजनाच्या दरात वाढ करावी लागेल. 

Although groceries are expensive, food prices in the city are still stable | किराणा महागला तरी शहरात भाेजनाचे दर सध्या स्थिरच

किराणा महागला तरी शहरात भाेजनाचे दर सध्या स्थिरच

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्हा मुख्यालयासह तालुकास्थळी छाेटी-माेठी अनेक हाॅटेल व भाेजनालये आहेत. भाेजनालयात जाऊन भाेजन करणाऱ्यांची संख्या शहरात कमी नाही. खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर गेल्या दाेन ते तीन महिन्यांत प्रचंड वाढले आहेत. शिवाय पेट्राेल, डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. याचा परिणाम हाॅटेल व भाेजनालय व्यवसायावर झाला आहे. असे असले तरी सध्या तरी गडचिराेली शहरासह जिल्ह्यातील भाेजनाचे दर स्थिर आहेत.
शहरातील हाॅटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी भाेजनाची व्यवस्था आहे. काही हाॅटेल १०० टक्के शाकाहारी आहेत. तर बऱ्याच हाॅटेलमध्ये दाेन्ही प्रकारचे भाेजन नागरिकांना उपलब्ध हाेत असते. घरचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्यानंतर संबंधित नागरिक हाॅटेल अर्थात भाेजनालयात जाऊन आपली भूक भागवितात. तसेच सामूहिक भाेजनासाठी हाॅटेलमध्ये जातात.

७० ते १३० रुपयांना मिळते साधी थाळी
-   फुटपाथवरील दुकानात भाजी, पाेळी, वरण, भात मिळून ७० रुपयाला पाेटभर जेवण मिळते. 
-    माेठ्या हाॅटेलमध्ये वरील सर्व साहित्यासह पापड, लाेणचे उपलब्ध केले जाते. या भाेजनाच्या थाळीचा दर १०० रुपये आहे.
-   शाकाहारी भाेजनात गाेड पदार्थ मागविल्यास ही थाळी १३० रुपयाला पडते. 
-   भाेजनालयामध्ये मासिक भाेजनाचीही व्यवस्था आहे. पदार्थानुसार व तेथील साेयीनुसार शहरात भाेजनाचे पैसे संबंधित ग्राहकाकडून घेतले जातात.

गुणवत्ता व साेयीनुसार माेजावे लागतात पैसे
गडचिराेली शहरात फुटपाथवरील छाेट्या हाॅटेलांसह माेठे हाॅटेल व भाेजनालय आहे. या भाेजनालयात गुणवत्ता व साेयीनुसार ग्राहकांना भाेजनासाठी पैसे माेजावे लागतात.
साेयीसुविधायुक्त व गुणवत्ता असलेल्या हाॅटेलमध्ये एका माणसाला मांसाहारी भाेजनासाठी ३०० ते ४०० रुपये लागतात. यात नवीन वर्षात वाढ झाल्यास एकाला ५०० रुपये भाेजनासाठी माेजावे लागणार आहेत. 

काेराेनाची दुसरी लाट आटाेक्यात आल्यानंतर भाेजनालयाच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली हाेती. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही जुन्या दरात ग्राहकांना भाेजन उपलब्ध करून देणे थाेडेसे कठीण झाले आहे. सरकारने खाद्यतेल व किराणा साहित्याच्या किमती येत्या काही दिवसांत कमी न केल्यास नाईलाजास्तव आम्हांला शाकाहारी व मांसाहारी भाेजनाच्या दरात वाढ करावी लागेल. 
- चंद्रकांत पतरंगे, अध्यक्ष, हाॅटेल असाेसिएशन, गडचिराेली
 

आमच्याकडे दीड वर्षापूर्वी भाेजनाच्या दरात वाढ करण्यात आली हाेती. आता १९०० रुपयाला मिळणारे तेलाचे पिंप २२०० रुपयांचे झाले आहे. तेवढे पैसे माेजून आम्हांला तेल आणावे लागत आहे. याशिवाय भाेजन तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य व किराणा मालाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या भाेजनाच्या दरात वाढ झाली नसली तरी सरकारकडून तत्सम साहित्याची दरवाढ कमी न झाल्यास नवीन वर्षात भाेजनाच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. डिझेल, पेट्राेल दरवाढीचा परिणामही किराणा साहित्याच्या किमतीवर झाला आहे.
- पवन सुचक, हाॅटेल व्यावसायिक, गडचिराेली

 

Web Title: Although groceries are expensive, food prices in the city are still stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.