रुग्णसंख्या घटली तरी मृत्यूदर वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:38 AM2021-05-18T04:38:21+5:302021-05-18T04:38:21+5:30
सोमवारी १३७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर ४१६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या २७ ...
सोमवारी १३७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर ४१६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ४७९ वर पोहोचली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २४ हजार ४५३ झाली आहे. सध्या २३९६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत एकूण ६३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सोमवारच्या ७ नवीन मृत्यूमध्ये ६१ वर्षीय पुरुष (रा. सावली, जि. चंद्रपूर), ४० वर्षीय पुरुष (कुरखेडा), ५४ वर्षीय पुरुष (शिक्षक कॉलनी गडचिरोली), ३८ वर्षीय पुरुष (घारगाव, ता. चामोर्शी), ५४ वर्षीय पुरुष (कोटगल), ८१ वर्षीय पुरुष (म्हाडा कॉलनी देसाईगंज), ४० वर्षीय महिला (टेकडा, ता. सिंरोचा) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.९९ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ८.७२ टक्के तर मृत्यूदर २.२९ टक्के झाला आहे. नवीन १३७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५१, अहेरी तालुक्यातील ३, आरमोरी १३, चामोर्शी तालुक्यातील २६, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली तालुक्यातील ५, कोरची तालुक्यातील ५, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ७, मुलचेरा तालुक्यातील १८, सिरोंचा तालुक्यातील ४ तर देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४१६ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १०२, अहेरी ६९, आरमोरी ६४, भामरागड ९, चामोर्शी ३४, धानोरा १२, एटापल्ली २६, मुलचेरा ७, सिरोंचा २३, कोरची ४, कुरखेडा २१, तसेच देसाईगंज येथील ४५ जणांचा समावेश आहे.