आंबेशिवणीच्या युवकाचा नागपूर जिल्ह्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:35 AM2021-04-06T04:35:45+5:302021-04-06T04:35:45+5:30

हिमांशू हा सेवकलाल साेनवणे, अखिल मंडपे (रा. नागपूर) व चेतन शेडमाके (रा. चामोर्शी) यांच्यासाेबत शिवा येथे नातेवाईकांकडे आले हाेते. ...

Ambeshivani youth drowns in Nagpur district | आंबेशिवणीच्या युवकाचा नागपूर जिल्ह्यात बुडून मृत्यू

आंबेशिवणीच्या युवकाचा नागपूर जिल्ह्यात बुडून मृत्यू

Next

हिमांशू हा सेवकलाल साेनवणे, अखिल मंडपे (रा. नागपूर) व चेतन शेडमाके (रा. चामोर्शी) यांच्यासाेबत शिवा येथे नातेवाईकांकडे आले हाेते. चाैघेही मित्र हिंगणा परिसरातील पिक्स ट्रान्समिशन नामक कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. सेवकरामचे नातेवाईक शिवा येथे राहत असल्याने चाैघेही दुचाकीने शिवा येथे नातेवाईकाकडे गेले हाेते. परतीच्या प्रवासात ते बाजागाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. दरम्यान, हिमांशू व चेतनला मंदिरालगत असलेल्या तलावात पाेहण्याचा माेह झाला. दाेघेही तलावात उतरले. परंतु, त्यांना याेग्यप्रकारे पाेहता येत नव्हते. दाेघेही खाेल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. सेवकराम व अखिलने पाण्यात दुपट्टा टाकला. दुपट्टा पकडून चेतन कसाबसा बाहेर आला. परंतु, हिमांशू खाेल पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यात मित्रांना यश आले नाही. याबाबतची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक तरुणांच्या मदतीने सायंकाळपर्यंत हिमांशूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी काेेंढाळी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली. हिमांशू हा चामाेर्शी येथील मतिमंद शाळेचे अधीक्षक रमेश झरकर यांचा लहान मुलगा हाेय. ५ एप्रिल रोजी स्वगावी आंबेशिवणी येथे हिमांशूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Ambeshivani youth drowns in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.