१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने ७० हजार रुग्णांची केली सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:38 AM2021-01-19T04:38:07+5:302021-01-19T04:38:07+5:30
बाॅक्स...... काेरचीच्या रुग्णवाहिकेने ११ हजार रुग्णांना पाेहाेचविले गडचिराेली जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या काेरची येथील रुग्णवाहिकेने सात वर्षांच्या कालावधीत ११ ...
बाॅक्स......
काेरचीच्या रुग्णवाहिकेने ११ हजार रुग्णांना पाेहाेचविले
गडचिराेली जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या काेरची येथील रुग्णवाहिकेने सात वर्षांच्या कालावधीत ११ हजार ४१६ रुग्णांना गडचिराेली व नागपूर येथील रुग्णालयात पाेहाेचविले आहे. ४१५ बाळ रुग्णवाहिकेतच जन्मले आहेत. अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत ८९ प्रसूती झाल्या आहेत. १४ हजार पेक्षा अधिक गराेदर मातांना प्रसूतीसाठी दुसऱ्या रुग्णालयात भरती केले आहे.
बाॅक्स ....
४ हजार ४६२ जखमींवर उपचार
अपघातात जखमी झालेल्या ४ हजार ४६२ गंभीर जखमींना वेळेवर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या जखमींना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने ७३७ जखमींचे प्राण वाचविले आहे. गडचिराेलीवरून चंद्रपूर, नागपूर येथे रुग्णाला हलविण्याकरिता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा सर्वाधिक वापर हाेतो. दुसऱ्या जिल्ह्यात रुग्णवाहिका जात असल्याने वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध हाेण्यास उशीर हाेते.
बाॅक्स .....
गडचिराेली रुग्णालयात तीन रुग्णवाहिका आहेत. या तीनही रुग्णवाहिका नागपूर व चंद्रपूर येथे रुग्णांना हलविण्यात व्यस्त राहतात. गडचिराेली जिल्हा रुग्णालयातील एकूण रुग्णांपैकी ५३ टक्के रुग्ण १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने नेले जातात. सात वर्षांत ६ हजार ४२ रुग्णांना नागपूर व चंद्रपूर येथे हलविले आहे.
देसाईगंज येथे दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहे. २८ जुलै २०१८ पासून ही रुग्णवाहिका सेवेत आहे. आत्तापर्यंत या रुग्णवाहिकेने १ हजार १६३ रुग्णांना सेवा दिली आहे.
बाॅक्स .....
लाभ घेतलेल्या रुग्णांची संख्या
गर्भधारणा रुग्ण १४, २०२
जन्मलेले बाळ ४१५
अपघात रुग्ण ४,४६२
जिल्ह्याबाहेर वाहतूक ६,०४२
एकूण रुग्णवाहतूक ६८,६००