सरपंच व सदस्यांना अपात्र करण्याच्या नियमांत सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:21+5:302021-08-23T04:39:21+5:30

निवेदनात म्हटले की, काही गावांत घराचे बांधकाम ५० वर्षांपूर्वी झाले आहे. यात काही गावांत नालीशेजारी घरे बांधण्यात आली आहेत, ...

Amend the rules for disqualification of Sarpanch and members | सरपंच व सदस्यांना अपात्र करण्याच्या नियमांत सुधारणा करा

सरपंच व सदस्यांना अपात्र करण्याच्या नियमांत सुधारणा करा

Next

निवेदनात म्हटले की, काही गावांत घराचे बांधकाम ५० वर्षांपूर्वी झाले आहे. यात काही गावांत नालीशेजारी घरे बांधण्यात आली आहेत, हीच बाब हेरून विरोधी गटातील नागरिक विद्यमान सरपंच व सदस्य यांच्या विरोधात तक्रारी करून त्या तक्रारी शहानिशा करून अनेक गावांतील सरपंच व सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. गावात नालीवर बांधकाम केलेली अनेक घरे रस्त्याच्या लगत दिसून येतात. मात्र, केवळ राजकीय आकसापोटी किरकोळ तक्रारी करून गावागावातील ग्रामपंचायत स्तरावरील राजकारण तापू लागले आहे. त्यामुळे अपात्र करण्याच्या नियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघटनेने केली आहे. निवेदन देताना ग्राम संवाद सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, अविनाश धामणे, राज्य सरचिटणीस गुणवंत अलमस्त, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष दिवाकर मिसार आदी उपस्थित होते.

220821\img-20210821-wa0190.jpg

निवेदन फोटो सं२पच संघटना

Web Title: Amend the rules for disqualification of Sarpanch and members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.