अमिर्झात धान खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:33 AM2021-01-18T04:33:36+5:302021-01-18T04:33:36+5:30
गडचिराेली : मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत अमिर्झा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राची सुरुवात रविवार १७ जानेवारीला करण्यात आली. माजी पं. स. ...
गडचिराेली : मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत अमिर्झा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राची सुरुवात रविवार १७ जानेवारीला करण्यात आली. माजी पं. स. सभापती तथा माजी जि. प. सदस्य आमीरअली नाथानी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. घाेट येथील विकास भात गिरणीच्या वतीने धान खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची साेय झाली आहे. केंद्राच्या शुभारंभप्रसंगी विकास भात गिरणीचे अध्यक्ष वसंतराव दुधबावरे, उपाध्यक्ष वासुदेव दुधबावरे, सचिव गुरुदास वैरागडे, संचालक ढिवरू बारसागडे, रानू पाेगुलवार, सीताराम बारसागडे, अशाेक पाेरेड्डीवार, नामदेव हिचामी, संचालिका शीला वैरागडे, निर्मला दुधबावरे, मिलिंद दुधबावरे, पं. स. सदस्य रामरतन गाेहणे, शंकर नैताम, नागरिक सुलतान नाथानी, खुशाबराव देशमुख, तंमुस अध्यक्ष बापूशा ढाेणे, सुरेश रंधये, लुमाजी निलेकार, दिवाकर निलेकार उपस्थित हाेते. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाला प्राधान्य द्यावे. कुणाचीही फसवणूक हाेणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनीही सतर्क राहावे, असे आवाहन आमीरअली नाथानी यांनी केले. प्रास्ताविक व आभार उपव्यवस्थापिका संगीता उपटालवार यांनी केले.