अन् अजगरच निघाला कोंबडीचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:26+5:302021-09-09T04:44:26+5:30

देसाईगंजपासून शंकरपूरमार्गे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलगाव येथील बहुतेक नागरिकांच्या कोंबड्या दररोज गायब होत असत. श्रावण मास संपत ...

And the dragon went out | अन् अजगरच निघाला कोंबडीचोर

अन् अजगरच निघाला कोंबडीचोर

Next

देसाईगंजपासून शंकरपूरमार्गे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलगाव येथील बहुतेक नागरिकांच्या कोंबड्या दररोज गायब होत असत. श्रावण मास संपत आल्याने कुणीतरी गावातील किंवा गावाबाहेरील कोंबडीचोर कोंबड्या चोरण्यासाठी चटावला असेल असा येथील नागरिकांचा अंदाज होता. त्यामुळे त्या कोंबडी चोराला रंगेहात पकडायचे असा निश्चय करून गावकऱ्यांनी पाळत ठेवली. यादरम्यान अमोल गोठे यांच्या घराजवळ वंजारी यांच्या कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मकडून कोंबड्या ओरडण्याचा आवाज आला. गावकऱ्यांनी लागलीच तिकडे धाव घेतली. पाहतात तर काय, प्रचंड मोठा अजगर त्यांच्या दृष्टिपथास पडला. गावकऱ्यांना ज्याचा शोध होता तो कोंबडीचोर हाच असल्याची खात्री पटली.

अजगराने त्या फार्ममधील तब्बल बारा कोंबड्या गिळंकृत केल्या होत्या. त्यामुळे संतापलेले गावकरी त्याला मारणार, तेवढ्यात अमोल गोठे यांनी त्यांना थांबवत देसाईगंज येथील आपल्या परिचयातील सर्पमित्राला बोलावून त्या अजगराला पकडले. त्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात (जंगलात) सोडण्यात आले.

080921\img-20210906-wa0143.jpg

देसाईगंज येथील सर्पमीञांनी अजगराची केली सुटका व सोडले मुक्त अधिवासात.

Web Title: And the dragon went out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.