अन् रस्ता सोडून बस ३० मीटर घुसली जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:49 PM2020-03-06T23:49:26+5:302020-03-06T23:50:03+5:30

नागपूरवरून प्रवाशी घेऊन एमएच ४०, क्यू ६१७१ क्रमांकाची बस सिरोंचाकडे जात होती. निमलगुडम गावाजवळ असलेल्या डोंगरदेवाजवळ बसचा समोरील पट्टा तुटला. त्यामुळे स्टेअरिंग जाम झाले. त्यामुळे भरधाव असलेल्या बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० मीटर अंतर पुढे गेली. रस्त्याच्या बाजूला जंगल आहे. मात्र झाडे विरळ असल्याने बसची झाडाला धडक बसली नाही.

And leaving the road just 30 meters into the forest | अन् रस्ता सोडून बस ३० मीटर घुसली जंगलात

अन् रस्ता सोडून बस ३० मीटर घुसली जंगलात

Next
ठळक मुद्दे२० प्रवासी बचावले : निमलगुडम गावाजवळची घटना; चालकाने दाखविले प्रसंगावधान

लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : निमलगुडम गावाजवळील डोंगरदेवजवळ नागपूरवरून सिरोंचाकडे जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने भरधाव बसटी बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० मीटर जंगलात शिरली. प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणाºया या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
नागपूरवरून प्रवाशी घेऊन एमएच ४०, क्यू ६१७१ क्रमांकाची बस सिरोंचाकडे जात होती. निमलगुडम गावाजवळ असलेल्या डोंगरदेवाजवळ बसचा समोरील पट्टा तुटला. त्यामुळे स्टेअरिंग जाम झाले. त्यामुळे भरधाव असलेल्या बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० मीटर अंतर पुढे गेली. रस्त्याच्या बाजूला जंगल आहे. मात्र झाडे विरळ असल्याने बसची झाडाला धडक बसली नाही. या बसमध्ये एकूण २० प्रवाशी बसले होते. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. सदर बस एच. बी. कुळमेथे हे चालवित होते, तर वाहक म्हणून एन.आर. नारवे होते. गडचिरोली जिल्ह्यात बस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आगारातून बस निघतेवेळी तपासणे आवश्यक आहे. मात्र बस तपासली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एटापल्ली मार्गावरही टळली दुर्घटना
अहेरी : एटापल्ली मार्गावरील येलचिल वळणावर धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बस रस्त्याच्या बाजूला गेली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने बस नियंत्रित होऊन कोणतीही जीवित हानी झाली नाही. अहेरी आगाराची एमएच-०७, सी-९५४५ ही बस गडचिरोलीवरून बोलेपल्ली मार्गे अहेरीसाठी निघाली. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान येलचिल गावाजवळील पहाडाच्या वळणावर येताच या बसचे स्टेअरिंग लॉक झाले. ही बाब लक्षात येताच चालक एम.एम. कोवे यांनी बस थांबविली. तरीही बस रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. यावेळी समोरून एखादे वाहन येत असते तर मोठी दुर्घटना घडली असती. चालकाने वाहन दुरूस्त करून पुन्हा अहेरीकडे मार्गस्थ केले. अहेरी आगाराच्या बसमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

Web Title: And leaving the road just 30 meters into the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.