आरमाेरीतील अंगणवाड्या नगर परिषदेच्या नियंत्रणाबाहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:53+5:302021-07-29T04:35:53+5:30
नगरसेविकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी शहराला नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त होऊन व पदाधिकाऱ्यांची निवड होऊन अडीच वर्षांचा कार्यकाल ...
नगरसेविकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी शहराला नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त होऊन व पदाधिकाऱ्यांची निवड होऊन अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे त्यांत महिला व बालविकास सभापती खाता निर्माण करून सभापतीची निवड करण्यात आलेली आहे .सदर खाता फक्त नामधारी असून त्यांना कोणताही अधिकार नाही. वास्तविक आरमोरी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अंगणवाड्या आतापर्यंत प्रशासनाच्या दृष्टीने नगर परिषदेत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही करावयास पाहिजे होती; परंतु अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही
आरमोरी तालुक्यात एकूण १९१ अंगणवाड्या असून यात १६२ मुख्य तर २९ मिनी अंगणवाडयांचा समावेश आहे. यातील आरमोरी नगर परिषद क्षेत्रात एकूण ३९ अंगणवाड्या असून, त्यांत ३३ मुख्य व ६ मिनी अंगणवाड्या आहेत. आरमोरी बीट क्रमांक १ मध्ये १४ मुख्य व १ मिनी, बीट क्रमांक २ मध्ये १८ मुख्य व ५ मिनी, तसेच रामाळामध्ये १ मुख्य अशा एकूण ३९ अंगणवाड्या आहेत. त्यांचे प्रशासन जिल्हा परिषद, गडचिरोलीअंतर्गत बालविकास प्रकल्प विभागामार्फत पाहिले जाते. सदर अंगणवाड्यांचा दर्जा अतिशय खालावला आहे.
नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३९ अंगणवाड्या नगर परिषदेमध्ये समाविष्ट केल्या तर स्थानिक पातळीवरून लक्ष देऊन दर्जा सुधारण्यासाठी निश्चितच मदत होईल. नगर परिषदेमध्ये असलेल्या महिला व बालविकास सभापतीलासुद्धा अधिकार प्राप्त होतील. नगरपरिषद कार्यक्षेत्रात येणाऱ्या ३९ अंगणवाड्या प्रशासनाच्या दृष्टीने समाविष्ट करण्याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून केली. नगर परिषदच्या महिला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार, नगरसेविका गीता सेलोकर,सुनीता मने, प्रगती नारनवरे यांनी निवेदन दिले आहे.
280721\img-20210728-wa0026.jpg
नागराध्यक्षस निवेदन देताना नागरसेविका