अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ थकली

By Admin | Published: March 13, 2017 01:27 AM2017-03-13T01:27:19+5:302017-03-13T01:27:19+5:30

मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र शासनाने जुलै २०१३ पासून ७५० रूपये मानधन वाढ केली आहे.

Anganwadi sevikas increase tension | अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ थकली

अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ थकली

googlenewsNext

३ एप्रिल रोजी आंदोलन करणार : मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अहेरीत मेळावा
अहेरी : मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र शासनाने जुलै २०१३ पासून ७५० रूपये मानधन वाढ केली आहे. मात्र अहेरी प्रकल्पातील मिनी अंगणवाडी सेविकांना या काळातील मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अहेरी प्रकल्प वगळता जिल्ह्यातील सर्व मिनी अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधनाचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र अहेरी प्रकल्पातील एकाही अंगणवाडी सेविकेला मोबदला मिळाला नाही. याबाबत प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी चव्हाण यांना अंगणवाडी सेविकांनी विचार केली असता, प्रकल्पातील कर्मचारी मागील आठ दिवसांपासून लेखणीबंद आंदोलन करीत आहेत. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आंदोलनाबाबत कळविण्यात आले असले तरी अजूनपर्यंत यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे वाढीव मानधनाचा मोबदला थकला असल्याची माहिती दिली. कार्यालयातील आंदोलनाचा परिणाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर पडला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. ३ एप्रिल रोजी मिनी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर १२ ते ३ या कालावधीत आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी दिली आहे. अहेरी येथे अंगणवाडी सेविकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला बहुतांश मिनी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. धरणे आंदोलनला उपस्थित राहावे, असे आवाहन संगीता वडलाकोंडावार, खैरूनिसा पठाण, विठाबाई भट, डी. एस. वैद्य, सत्तुबाई एनप्रेडीवार यांनी केले आहे.

Web Title: Anganwadi sevikas increase tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.