अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक

By admin | Published: March 23, 2017 12:52 AM2017-03-23T00:52:57+5:302017-03-23T00:52:57+5:30

मानधन वाढ व बोनसच्या मुद्यावर जिल्हाभरातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकच्या बॅनरखाली मुक्काम आंदोलन केले.

Anganwadi women workers aggressive | अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक

अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक

Next

शासन व प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी : जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
गडचिरोली : मानधन वाढ व बोनसच्या मुद्यावर जिल्हाभरातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकच्या बॅनरखाली मुक्काम आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे, डॉ. महेश कोपुलवार व विनोद झोडगे यांनी केले. शासन निर्णयाप्रमाणे गठित केलेल्या मानधन वाढ समितीने ९ मार्च २०१७ रोजी शासनाला मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला. प्रधान सचिवांनी सादर केलेल्या अहवालाप्रमाणे मानधनवाढ व दिवाळी बोनसकरिता १८ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली नाही. यामुळे आयटक पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने १० मार्च रोजी मुंबई येथील विधानसभेवर विशाल मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली नाही. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत, असा आरोप भाषणातून डॉ. महेश कोपुलवार, विनोद झोडगे, देवराव चवळे आदींनी केला.
या मुक्कामी आंदोलनात संघटनेच्या पदाधिकारी राधाबाई ठाकरे, कौशल्या गोंधोळे, मिरा कुरंजेकर, शशिकला धात्रक, सपना रामटेके, मीनाक्षी झोडे, कांता फटिंग, दुर्गा पुर्वे, अनिता अधिकारी, शिवलता बावनथडे, बसंती अंबादे, ज्योती कोमलवार, जहारा शेख, रूपा पेंदाम, जायशा शेख, ज्योती कोल्हापुरे, रेखा जांभुळे, लता मडावी, यशोदा दहागावकर आदी उपस्थित होत्या.

Web Title: Anganwadi women workers aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.