कोरोनाने अंगणवाडी सेविका व शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:33+5:30

जिल्ह्यातील एकूण क्रियाशिल कोरोना बाधितांचा आकडा ९३२ झाला. आत्तापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ४ हजार ३०६ वर पोहचली आहे. यापैकी ३ हजार ३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्ह्यात सद्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.५७ टक्के आहे. क्रियाशिल रूग्णांची टक्केवारी २१.६४ असून मृत्यूदर ०.७९ टक्के आहे.

Anganwadi worker and farmer death by Corona | कोरोनाने अंगणवाडी सेविका व शेतकऱ्याचा मृत्यू

कोरोनाने अंगणवाडी सेविका व शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमृत्यूदर ०.७९ टक्के : एकूण बाधितांची संख्या ४ हजार ३०६; २४५ रूण घरीच घेत आहेत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात नवीन २ कोरोना बाधितांच्या मृत्यूसह गुरूवारी ७० नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच एकूण क्रियाशिल बाधितांमधील १३१जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यातील एकूण क्रियाशिल कोरोना बाधितांचा आकडा ९३२ झाला. आत्तापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ४ हजार ३०६ वर पोहचली आहे. यापैकी ३ हजार ३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्ह्यात सद्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.५७ टक्के आहे. क्रियाशिल रूग्णांची टक्केवारी २१.६४ असून मृत्यूदर ०.७९ टक्के आहे.
गुरूवारी २ मृत्यूची नोंद झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये आरमोरी येथील ४२ वर्षीय अंगणवाडी सेविका मधुमेहग्रस्त होती. तसेच ६८ वर्षीय भेंडाळा येथील मधुमेहग्रस्त व हायपरटेन्शन ग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
नवीन ७० बाधितांमध्ये गडचिरोली येथील १४ जणांचा समावेश आहे. यामध्ये वंजारी मोहल्ला येथील २, मेडिकल कॉलनी मधील ३, अडपल्ली येथील २, आयटीआय चौक येथील १, अल्हाद नगर वार्ड नं १४ येथील १, विसापूर हेटी १, चामोर्शी रोड १, स्थानिक ३ जणांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये वैरागड येथील १, आरमोरी येथील स्थानिक २, भाकरोंडी १, बर्डी १, सुकाळा १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, मकलुगी येथील १, अंधारी येथील १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये आष्टी येथील १, पीएचसी भेंडाळा येथील १, स्थानिक १, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, साल्हे २, वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये चोप येथील १, स्थानिक १, डोंगरगाव येथील १, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ६, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक सीआरपीएफचे ५, बुर्गी येथील १, स्थानिक ३, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २, श्रीरामपुर येथील १, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ४, चातगांव येथील २, सोडे १, येरकड येथील २, पोलीस स्टेशन काटेझरी येथील १, तुकुम १, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये वार्ड नं. २ मधील २, वार्ड नं १० मधील १ जणाचा समावेश आहे. सावली तालुक्यातील चिखली येथील एक जण बाधित आढळून आला आहे.

मुलचेरा येथे केवळ एकच रूग्ण शिल्लक
काही तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना काही तालुक्यांमध्ये मात्र कोरोना रूग्णांची संख्या घटत चालली असल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुलचेरा तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एक रूग्ण उपचार घेत आहे. कुरखेडा येथे २६ रूग्ण उपचार घेत आहेत. कोरचीत १७, सिरोंचा १६, भामरागड येथे १४, आरमोरी येथे ८३ रूग्ण उपचार घेत आहेत. शासनाने होम आयशोलेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २४५ रूग्ण होम आयशोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.

Web Title: Anganwadi worker and farmer death by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.