अंगणवाडी सेविका ‘नाॅट रिचेबल’; टप्प्याटप्प्याने माेबाईल परत करणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:25+5:302021-09-14T04:43:25+5:30

गडचिराेली : डिजिटल अंगणवाडीची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अंगणवाडीतील विविध दस्तावेजाशी संबंधित कामे व नाेंदी घेण्यासाठी सेविकांना शासनाकडून माेबाईल देण्यात ...

Anganwadi worker ‘not reachable’; Continue to return the mobile in stages | अंगणवाडी सेविका ‘नाॅट रिचेबल’; टप्प्याटप्प्याने माेबाईल परत करणे सुरूच

अंगणवाडी सेविका ‘नाॅट रिचेबल’; टप्प्याटप्प्याने माेबाईल परत करणे सुरूच

Next

गडचिराेली : डिजिटल अंगणवाडीची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अंगणवाडीतील विविध दस्तावेजाशी संबंधित कामे व नाेंदी घेण्यासाठी सेविकांना शासनाकडून माेबाईल देण्यात आले हाेते; परंतु या माेबाईलचा दर्जा निकृष्ट व त्यात वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांनी १७ ऑगस्टपासून माेबाईल परत करण्याचे आंदाेलन सुरू केले. सध्या जिल्ह्यात चार प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी माेबाईल परत केले आहे. त्यामुळे त्या ‘नाॅट रिचेबल’ आहेत. टप्प्याटप्प्याने इतरही प्रकल्पातील सेविका माेबाईल परत करणार आहेत. त्यामुळे पाेषण आहारासह विविध ऑनलाईन नाेंदीची कामे रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स ....

कामांचा व्याप

अंगणवाडी सेविकांना सर्व आहार याेजनेच्या लाभार्थ्यांची नाेंदणी करणे, लहान मुलांची वयाेगटानुसार वजन, उंची नाेंदविणे, लसीकरण, अंगणवाडी इमारतीतील साेयीसुविधा, गर्भवती महिलांना पाेषण आहार यासह विविध प्रकारच्या नाेंदी ठेवाव्या लागत असल्याने कामाचा व्याप वाढला आहे.

बाॅक्स .....

म्हणून केला माेबाईल परत

गडचिराेली जिल्ह्यातील बहुतांश जुन्या अंगणवाडी सेविका इयत्ता चाैथी ते आठवीपर्यंतच शिक्षित आहेत. त्यांना इंग्रजी ॲप असलेले माेबाईल हाताळता येत नाही.

शासनाने पुरविलेल्या माेबाईलचा दर्जा फारसा चांगला नाही. ताे वारंवार हॅंग हाेणे, काम न करणे, गरम हाेणे यासारख्या समस्या उदभवत हाेत्या.

सर्व्हिस चार्जसह दुरुस्तीचाही खर्च कर्मचाऱ्यांवर बसत हाेता. त्यामुळे अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या.

काेट .....

कव्हरेज व इंटरनेटची हाेती समस्या

आमचे गाव अतिदुर्गम भागात वसले आहे. येथे माेबाईलचा कव्हरेज व इंटरनेट याेग्यप्रकारे पकडत नाही. ही समस्या असतानाच विविध प्रकारच्या नाेंदी माेबाईलवर ठेवताना अडचणी येत हाेत्या.

- श्यामला गेडाम, अंगणवाडी सेविका.

अंगणवाडीमधील विविध प्रकारच्या नाेंदी पाेषण ट्रॅक ॲपवर ठेवताना सेविकांना अडचणी येतात. तरीसुद्धा प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत हाेते. यातच तांत्रिक अडचणी आल्याने खूप त्रास झाला.

- उषा शेंडे, अंगणवाडी सेविका.

माेबाईल दुरुस्तीचा खर्च शासनाने द्यावा, यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडे मागणी करण्यात आली; परंतु दुर्लक्षच झाले. ज्या दुकानदारांना माेबाईल दुरुस्तीचे टेंडर दिले आहे त्यांच्याकडून तीन ते चार हजारांचे बिल पाठविले जात आहे.

- देवराव चवळे, जिल्हाध्यक्ष आयटक.

Web Title: Anganwadi worker ‘not reachable’; Continue to return the mobile in stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.