अंगणवाडी सेविकांनी जुने १८७ मोबाइल केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:33+5:302021-09-10T04:44:33+5:30

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलची स्थिती अतिशय खराब झाली आहे. त्याची वाॅरंटी संपलेली आहे. मोबाइल गरम होतो, हँग होतो, ...

Anganwadi workers return 187 old mobiles | अंगणवाडी सेविकांनी जुने १८७ मोबाइल केले परत

अंगणवाडी सेविकांनी जुने १८७ मोबाइल केले परत

Next

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलची स्थिती अतिशय खराब झाली आहे. त्याची वाॅरंटी संपलेली आहे. मोबाइल गरम होतो, हँग होतो, बंद पडतो तसेच वारंवार बिघाड येतो. सदर मोबाइल दुरुस्त केल्यास त्याचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच भरावा लागताे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी माेबाइलमध्ये पुरेसा स्पेस शिल्लक नाही. त्यामुळे कालबाह्य झालेले मोबाइल परत घेण्याच्या मागणीसाठी आयटकच्या वतीने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात आयटकचे अध्यक्ष देवराव चवळे, कामगार नेते डॉ. महेश कोपुलवार, मीनाक्षी सेलोकर, संजय वाकडे, अमोल दामले, मीरा कुर्झेकर, कविता चन्ने, मीरा कुर्वे, रेखा जांभुळे, अल्का लाउतकर, मीरा उईके, प्रभा बावनकर, रूपाली क्षीरसागर, रूपाली टेंभुर्णे, नयनप्रभा टेंभुर्णे, हर्षता धाकडे, सुरेखा कानतोडे, श्रद्धा गणवीर, प्रमिला मने व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बाॅक्स

वैयक्तिक माेबाइलचा शासकीय कामांसाठी वापर नाही

अंगणवाडी सेविकांना त्यांच्या वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या सामूहिक मोबाइलवर शासकीय काम करण्यास भाग पाडू नये, कारण सदर मोबाइल हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा पाल्य ऑनलाइन शिक्षणाकरिता किंवा खाजगी कामाकरिता वापरत असताना शासनाला माहिती पाठविण्याच्या माहितीत चुकीचा संदेश जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करावे, अशी मागणी करून जुने निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत करण्यात आले व नवीन चांगल्या दर्जाचे मोबाइल देण्याची मागणी करण्यात आली.

090921\img_20210909_162406.jpg

आयटक च्या वतीने आंदोलनात सहभागी अंगणवाडी सेविका

Web Title: Anganwadi workers return 187 old mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.