एन्जल बनली ग्रॅन्डमास्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:57 PM2018-06-18T22:57:14+5:302018-06-18T22:57:30+5:30

सिकई मार्शल आर्टमध्ये २२ सुवर्ण पदके पटकाविणाऱ्या गडचिरोली येथील एन्जल विजय देवकुले हिला रेकॉर्ड युनिर्व्हसीटी संलग्नीत युनायडेट किंगडम सरकारद्वारा ग्रॅन्डमास्टर किताब प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती तिचे प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Angel became the Grandmaster | एन्जल बनली ग्रॅन्डमास्टर

एन्जल बनली ग्रॅन्डमास्टर

googlenewsNext
ठळक मुद्देसिकई मार्शल आर्ट : नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिकई मार्शल आर्टमध्ये २२ सुवर्ण पदके पटकाविणाऱ्या गडचिरोली येथील एन्जल विजय देवकुले हिला रेकॉर्ड युनिर्व्हसीटी संलग्नीत युनायडेट किंगडम सरकारद्वारा ग्रॅन्डमास्टर किताब प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती तिचे प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
एन्जल देवकुलेने अवघ्या नवव्या वर्षी सिकई मार्शल आर्टमध्ये दोन जागतिक विक्रम व सहा विविध विक्रमांची नोंद केली आहे. तिच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड युनिर्व्हसिटीने तिला ग्रॅन्ड मास्टर हा किताब बहाल केला आहे. ग्रॅन्डमास्टरचा किताब पटकावणारी एन्जल ही सिकई मार्शल आर्टमधील सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्टÑ सिकई मार्शल आर्टचे अध्यक्ष मझहर खान उपस्थित होते. तिचे हे यश जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे, अशी माहिती पेदापल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पालक विजय देवकुले, स्वाती देवकुले, शर्मिश वासनिक हजर होते.

Web Title: Angel became the Grandmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.