एंजल देवकुळेची चॅम्पियन बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:34 AM2021-02-12T04:34:32+5:302021-02-12T04:34:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : स्थानिक प्लॅटिनम ज्युबली स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी एंजल देवकुळे हिची चॅम्पियन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : स्थानिक प्लॅटिनम ज्युबली स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी एंजल देवकुळे हिची चॅम्पियन वर्ल्ड रेकार्डमध्ये नुकतीच नाेंद झाली आहे. स्काय मार्शल ऑर्ट या खेळातील जागतिक सुवर्णपदक मिळविणारी एंजल ही सर्वात कमी वयाची पहिली आशियाई सुवर्णपदक विजेती चॅम्पियन ठरली आहे.
सन २०१७ मध्ये एंजलने थायलॅंड येथे झालेल्या पाचव्या आशियाई स्पर्धेत दाेन सुवर्णपदक प्राप्त केले. २०१८ मध्ये साऊथ काेरियामध्ये झालेल्या तिसऱ्या विश्वकप स्काय मार्शल ऑर्टमध्ये दाेन सुवर्णपदक प्राप्त केले. २०१९ मध्ये मार्शल ऑर्ट खेळासाठी तिला राष्ट्रपती भवनात सन्मानित करण्यात आले. २२ जानेवारी २०२० मध्ये राष्ट्रपती भवन दिल्ली येथे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले हाेते. आशियामधील पाच प्रभावशाली खेळाडूमध्ये एंजलच्या नावाची नाेंद आहे. एंजलचा आजी, माजी मंत्र्यांकडून अनेकदा गाैरव झाला आहे. एंजलच्या यशासाठी मार्गदर्शक संदीप पेदापल्ली यांनी सहकार्य केले. यशाबद्दल संस्थेचे महासचिव अजीज नाथानी, प्राचार्य रहिम अमलानी यांनी एंजलचे काैतुक केले आहे. एंजलने आपल्या यशाचे श्रेय वडील विजय देवकुळे, आई स्वाती देवकुळे, संस्थेचे महासचिव अजीज नाथानी, प्राचार्य रहिम अमलानी व मार्गदर्शक संदीप पेदापल्ली यांना दिले आहे.