संतप्त महिलांची नगर परिषद उपाध्यक्षांच्या घरावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:00 AM2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:16+5:30

आरमोरी बर्डी परिसरात मुख्य महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. सदर मार्गाच्या खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे शहरात ऐन हिवाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मुनादी दिली नाही.

Angry Women Knocks at City Council Vice President's House | संतप्त महिलांची नगर परिषद उपाध्यक्षांच्या घरावर धडक

संतप्त महिलांची नगर परिषद उपाध्यक्षांच्या घरावर धडक

Next
ठळक मुद्देनगर परिषद सुस्त : पाईपलाईन फुटल्याने आरमोरीतील पाणी पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शहरातील काही भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यामुळे ऐन हिवाळ्यात महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रभाग क्रमांक ४ मधील महिलांनी पाणी समस्येवर आक्रमक होत रविवारी सकाळी नगर परिषदेच्या उपाध्यक्षाच्या घरावर धडक दिली.
आरमोरी बर्डी परिसरात मुख्य महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. सदर मार्गाच्या खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे शहरात ऐन हिवाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मुनादी दिली नाही. तसेच कोणतीही उपाययोजना केली नाही. फुटलेली पाईपलाईन दुरूस्त करण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी रविवारी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी यांच्या घरावर धडक दिली. याप्रसंगी नितेश अंबादे, राजू रामटेके, कबिर रामटेके, अमर गेडाम, स्वप्नील गिरडकर, मिलिंद घाटुरकर, सुरेखा रामटेके, छाया रामटेके, तारा रामटेके, रजनी हुमने, भामिना कोल्हे, कमला सोनकुसरे, तनुजा कोल्हटकर, वर्षा खोब्रागडे, ममता खोब्रागडे, सुनिता सोरते आदीसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

अन्यथा ठिय्या आंदोलन करू
उपाध्यक्षांच्या घरासमोर झालेल्या या छोट्याखानी आंदोलनाच्या ठिकाणी नगराध्यक्ष पवन नारनवरे यांनाही बोलाविण्यात आले. प्रभाग क्रमांक ४ मधील पाणी समस्या लवकर सोडवा, अन्यथा नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा महिलांनी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांना तसेच प्रशासनाला यावेळी दिला.

Web Title: Angry Women Knocks at City Council Vice President's House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा