संतप्त महिलांनी घेतली आष्टी पोलीस ठाण्यातच ग्रामसभा
By admin | Published: June 1, 2016 02:01 AM2016-06-01T02:01:02+5:302016-06-01T02:01:02+5:30
आष्टी परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याबाबतचा ठराव तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पारित करण्यात आला होता.
११ दारूअड्डे बंद करा : फेब्रुवारीपासून केली होती मागणी
आष्टी : आष्टी परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याबाबतचा ठराव तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पारित करण्यात आला होता. मात्र दारूविक्री बंद करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे ग्रामसभांकरिता जमलेल्या शेकडो संतप्त महिला पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यानंतर येथेच ग्रामसभा पार पडली.
दरम्यान, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह महिलांनी आष्टी गावात सुरू असलेले ११ दारू अड्डे तत्काळ बंद करावे, तसेच आष्टी परिसरातून दारू पूर्णत: हद्दपार करावी, अशी मागणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांच्याकडे केली.
यापूर्वी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी आष्टी येथील जि. प. प्राथमिक शाळेत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव पारित केला. मात्र तीन महिने उलटूनही अवैध दारूविक्रीस जोरात सुरू आहे. मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत ठराव पारित करूनही अवैध दारूविक्रीला आळा का घालण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करून संतप्त महिला पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यामुळे पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. याप्रसंगी प्रभारी ठाणेदार नितेश गोहणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, पोलीस हवालदार जसवंत बसू, गुरनुले, मिलींद पेलावार, अंबादास खेडकर आदी उपस्थित होते.
ग्रामसभेला सरपंच वर्षा देशमुख, उपसरपंच नंदा डोर्लीकर, ग्रा. पं. सदस्य माया ठाकूर, ज्योत्सना मेश्राम, नम्रता कुकुडकर, विभा देठे, ग्रा. पं. सदस्य कपील पाल, बंडू कुबडे, आनंद कांबळे, गणेश चौधरी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी बी. डी. चौधरी, वच्छला वाघाडे, नंदा चांदेकर, ललीता झाडे, लीला ठाकूर, पौर्णिमा डोर्लीकर, कल्पना झाडे, रेखा कुबडे, ललिता औतकर, विद्या जुनघरे, लीला तिवाडे, शालिनी भसारकर, अनू कुबळे, लक्ष्मी बुर्ले, विमला मांडवगडे, दिवाकर कुंदोजवार, दीपक ठाकूर, व्यंकटी बुर्ले, संतोष सोयाम, जितेंद्र गलबले, रवी नामेवार, विजय नंदागवळी, ईश्वर बावणे, अक्षय कलाक्षपवार, राजकपूर गलबले, कालिदास मेश्राम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.