शेकडो शेतकऱ्यांना पशुपालनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:08 PM2019-03-04T22:08:30+5:302019-03-04T22:09:02+5:30

भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थान केंद्र पुणे व भारतीय किसान संघ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गडचिरोली येथील गोंडवाना कला दालनात पशुपालन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यासह जिल्हाभरातील शेकडो शेतकऱ्यांनी घेतला.

Animal lessons for hundreds of farmers | शेकडो शेतकऱ्यांना पशुपालनाचे धडे

शेकडो शेतकऱ्यांना पशुपालनाचे धडे

Next
ठळक मुद्देगडचिरोलीत प्रशिक्षण : कुक्कुट पालन, शेळी पालन व्यवसायाची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थान केंद्र पुणे व भारतीय किसान संघ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गडचिरोली येथील गोंडवाना कला दालनात पशुपालन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यासह जिल्हाभरातील शेकडो शेतकऱ्यांनी घेतला.
प्रशिक्षणाचे उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. एस. वंजारी होते. प्रमुख अतिथी म्हणून अजय पोहोरकर, डॉ. किरण मिलेगावकर, तसेच भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश उपलवार, किरण सर्वे, उदय बोरावार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कुकुट पालन, शेळी पालन व इतर पशु पालन व्यवसायाबाबत सविस्तर माहिती दिली. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकºयांनी पशुपालन व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी प्रेमानंद सोनटक्के, मारोती राऊत, प्रकाश तुमपल्लीवार, अ‍ॅड. विलास भुगुवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Animal lessons for hundreds of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.