आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Published: October 21, 2015 01:25 AM2015-10-21T01:25:50+5:302015-10-21T01:25:50+5:30

आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये नुकसान भरपाई चार हेक्टरपर्यंत देण्यात यावी.

Announce the drought in Armori taluka | आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Next

मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना निवेदन : तालुका काँग्रेसचे शिष्टमंडळ तहसीलदारांना भेटले
आरमोरी : आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये नुकसान भरपाई चार हेक्टरपर्यंत देण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार आनंदराव गेडाम, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी यांनी केले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार वलथरे यांना घेराव घालण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी तालुक्यात यंदा खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे १०० टक्के रोवणी होऊ शकले नाही. ज्या शेतकऱ्यांनी धानपिकाची रोवणी केली त्या शेतकऱ्यांचे धानपीक पावसाअभावी करपले. तर काही शेतकऱ्यांच्या धानपिकावर गादमाशी, तुडतुडा, खोडकिडा, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यंदा धानाचे उत्पादन प्रचंड घटणार आहे. महिनाभरापासून पाऊस नसल्याने हजार हेक्टर शेतामधील धानपीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटाता सापडला आहे. आरमोरी तालुक्यात धानपीकाची आणेवारी ४० टक्क्याच्या आत आहे. मात्र सर्वे योग्यरित्या करण्यात आला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी माजी जि.प. सभापती आनंदराव आकरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, अशोक वाकडे, बग्गु ताडाम, मिलिंद खोब्रागडे, सुभाष सपाटे, श्रीनिवास आबंटवार, चंदू वडपल्लीवार, रघुनाथ मोगरकर, अनिल सोमनकर, दिलीप घोडाम, वघाळाच्या सरपंच मनिषा दोनाडकर, यज्ञकला ठवरे, नरेश टेंभुणे, खेमराज दामले, प्रभाकर टेंभुर्णे, भोलेनाथ धानोरकर, निलकंठ गोहणे, प्रविण राहाटे, यशवंत लोणारे, बेबी सोरते व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Announce the drought in Armori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.