जिल्हाभरात ११४ कोरोना रूग्णांची आणखी पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:27+5:30
कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली ५३ मध्ये आनंदनगर १, रेड्डी गोडावून मागे ३, सीआरपीएफ १, शहरातील इतर ४, लांझेडा १, मच्छी मार्केट जवळ १, रामनगर ६, सुभाष चौक १, आशिर्वादनगर १, आयोध्यानगर १, आनंदनगर १, पोलीस स्टेशन मागे १, कॅम्पएरिया ३, चामोर्शी रोड १, कलेक्टर कॉलनी १, डोंगरगाव १, फुले वार्ड २, गोकूळनगर २, कारगिल चौक १, कारवाफा १, नवेगाव ४, मेडिकल कॉलनी २, पोलीस कॉलनी १, सर्वोदय वार्ड ७, सोनापूर कॉम्प्लेक्स १, त्रिमुर्ती चौक १, वनश्री कॉलनी १, वीर बाबुराव शेडमाके १ व वंजारी वार्डातील १ जणाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरात ११४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर १०१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ५४६ एवढी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ हजार ६७१ वर पोहोचली आहे. सध्या ८३९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.७५ टक्के असून मृत्यू दर ०.७९ टक्के आहे.
कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली ५३ मध्ये आनंदनगर १, रेड्डी गोडावून मागे ३, सीआरपीएफ १, शहरातील इतर ४, लांझेडा १, मच्छी मार्केट जवळ १, रामनगर ६, सुभाष चौक १, आशिर्वादनगर १, आयोध्यानगर १, आनंदनगर १, पोलीस स्टेशन मागे १, कॅम्पएरिया ३, चामोर्शी रोड १, कलेक्टर कॉलनी १, डोंगरगाव १, फुले वार्ड २, गोकूळनगर २, कारगिल चौक १, कारवाफा १, नवेगाव ४, मेडिकल कॉलनी २, पोलीस कॉलनी १, सर्वोदय वार्ड ७, सोनापूर कॉम्प्लेक्स १, त्रिमुर्ती चौक १, वनश्री कॉलनी १, वीर बाबुराव शेडमाके १ व वंजारी वार्डातील १ जणाचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली १ व अहेरीतील ९ जण, आरमोरी येथील १, भामरागड येथील ३, चामोर्शी तालुक्यातील ७ जणांमध्ये गायत्रीनगर १, आष्टी १, घोट १, कोनसरी १, कुरूड १ व वायगाव २ जणांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील २ रूग्णांमध्ये शहरातील १ व झरी येथील एकाचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील ५ जणांमध्ये जारावंडी १, हालेवारा १ व स्थानिक ३ जणांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील ९ जणांमध्ये स्थानिक ३, खरामटोला गेडाम हॉस्पीटल १, गोठणगाव १, कुंभीटोला १, मरळ १, नान्ही १ व सावरखेडा येथील १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील ३ जण लगाम येथील आहेत. सिरोंचा तालुक्यातील ५ जणांमध्ये सर्वजण स्थानिक आहेत. देसाईगंज तालुक्यातील १६ जणांमध्ये सीआरपीएफ २, कन्नमवार वार्ड ३, आमगाव ३, मधुबन कॉलनी १, एक्कलपूर विसोरा २, हनुमान वार्ड २, कींबाडा १, नैनपूर १ व सावंगी येथील १ जणाचा समावेश आहे.
कोरोना बाधित रूग्णांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे.
अनलॉकमुळे आणखी संसर्ग वाढण्याची शक्यता
अनलॉकची प्रक्रिया राबविताना शासनाने आठवडी बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. तसेच बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. एसटी सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क येणार आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच पुढे दसरा, दिवाळी, भाऊबीज यासारखे मोठे सण आहेत. या सणांच्या निमित्ताने गर्दी होणार आहे. तसेच नागरिक दुसऱ्यांकडे पाहुणे म्हणून जाणार आहेत. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.