गडचिरोली शहरासाठी आणखी १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:57 PM2018-07-30T22:57:50+5:302018-07-30T22:58:27+5:30

गडचिरोली : राज्य शासनाने गडचिरोली शहराच्या विकासासाठी १५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर चामोर्शी नगर पंचायतीला पाच कोटी व धानोरा नगर पंचायतीला ४.५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Another 15 crores fund for Gadchiroli | गडचिरोली शहरासाठी आणखी १५ कोटींचा निधी

गडचिरोली शहरासाठी आणखी १५ कोटींचा निधी

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाकडून मदत : चामोर्शीला ५ तर धानोरा ४.५ कोटी
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली : राज्य शासनाने गडचिरोली शहराच्या विकासासाठी १५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर चामोर्शी नगर पंचायतीला पाच कोटी व धानोरा नगर पंचायतीला ४.५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान अंतर्गत (राज्यस्तर) निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गडचिरोली नगर परिषदेने राज्य शासनाकडे सादर केला होता. याबाबत आ.डॉ.देवराव होळी व नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१८ च्या जुलै महिन्यातील पुरवणी अर्थसंकल्पात १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीचे पत्र आ.डॉ.देवराव होळी यांनी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांना सोमवारी सादर केले. यावेळी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, गुलाब मडावी, प्रशांत खोब्रागडे, अल्का पोहणकर, प्रकाश अर्जुनवार, स्वप्नील वरघंटे, अविनाश विश्रोजवार, अनिल पोहणकर, गौरकर, रोशन मसराम, प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते.
यापूर्वी राज्य शासनाने ओपनस्पेसच्या विकासासाठी पाच कोटी रूपये व अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम यांच्यासाठी १५ कोटी रूपये असे एकूण २० कोटी उपलब्ध झाले होते. या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कामांना सुरुवात करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Another 15 crores fund for Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.