अजून ४७ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:23+5:30

नवीन रुग्णांमध्ये गडचिरोली शहरातील २५ जण समावेश आहेत. यात शाहूनगर पोटेगाव रोड ३, संविधान चौक १, पोस्ट आॅफिस २, कारमेल शाळेच्या मागील १, कलेक्टर कॉलनीतील १, अयोध्यानगर २, मथुरा नगर १, वार्ड नंबर १८ शिवाजीनगर १, हनुमान वार्ड १, पेट्रोलपंप नवेगावजवळ १, आर्या शोरूम जवळ १, गोविंदपूर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, तसेच इतर जिल्ह्यातील काही जणांचा समावेश आहे.

Another 47 new corona affected | अजून ४७ नवीन कोरोनाबाधित

अजून ४७ नवीन कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्दे२८ जणांना सुटी : अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या झाली ४५१; सर्वाधिक गडचिरोली शहरातील

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी ४७ नवीन रुग्णांची भर पडली. तर जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. यामुळे क्रियाशिल (अ‍ॅक्टिव्ह) रु ग्णांची संख्या प्रथमच ४५१ झाली आहे. आतापर्यंतच्या बाधित रुग्णांनीही दीड हजारांचा टप्पा पार करत १७०९ चा पल्ला गाठला आहे. त्यात ७ जण दगावले.
नवीन रुग्णांमध्ये गडचिरोली शहरातील २५ जण समावेश आहेत. यात शाहूनगर पोटेगाव रोड ३, संविधान चौक १, पोस्ट आॅफिस २, कारमेल शाळेच्या मागील १, कलेक्टर कॉलनीतील १, अयोध्यानगर २, मथुरा नगर १, वार्ड नंबर १८ शिवाजीनगर १, हनुमान वार्ड १, पेट्रोलपंप नवेगावजवळ १, आर्या शोरूम जवळ १, गोविंदपूर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, तसेच इतर जिल्ह्यातील काही जणांचा समावेश आहे. तसेच देसाईगंज येथील सीआरपीएफचे ३ जवान, हनुमान वार्ड मधील १, राजेंद्र वार्डमधील ३ आहेत.

किमान आठवडाभर जनता कर्फ्यू करा-खा.नेते
लॉकडाऊनमध्ये सरकारने शिथिलता दिल्याने कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात किमान आठवडाभर जनता कर्फ्यूचे आयोजन करावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. मी दोन वेळा दिल्लीत आणि एक वेळ नागपूर येथे कोरोना टेस्ट केली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण याचा अर्थ मला कोरोना होणारच नाही असे नाही. तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगत काही गरजू लोकांना कार्यकर्त्यांमार्फत मास्कचे वाटपही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनता कर्फ्यूचा निर्णय नाही
जिल्ह्यात कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग गडचिरोली शहरात आहे. त्यामुळे शहराच्या हद्दीत जनता कर्फ्यू ठेवण्याबाबत व्यापारी, प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. हा कर्फ्यू दि.१७ पासून असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. मात्र तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी ती शक्यता फेटाळून लावत त्याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. जनता कर्फ्यू कधीपासून होणार हे आधीच नागरिकांना कळविले जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Another 47 new corona affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.