अन् सरपंचाने पाडले स्वतःचेच घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 05:00 AM2021-08-01T05:00:00+5:302021-08-01T05:00:37+5:30

मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते. एका व्यक्तीने त्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध ग्रामपंचायतमध्ये नमुना आठची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवकाने सरपंच यांना कळवली. सरपंचाचे घर अतिक्रमणात असल्यास सदस्यत्वच रद्द होईल. परिणाम, सरपंचपदही गमवावे लागेल, ही बाब सरपंचाच्या लक्षात येताच शनिवार, ३१ जुलै रोजी सरपंचांनी आपले घर जेसीबी लावून पाडले.

Ansarpanch demolished his own house | अन् सरपंचाने पाडले स्वतःचेच घर

अन् सरपंचाने पाडले स्वतःचेच घर

Next
ठळक मुद्देअतिक्रमणामुळे पद जाण्याच्या भीतीने जेसीबी लावून केले भुईसपाट

लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : गावचे सरपंच होण्यापूर्वी अतिक्रमण करून बांधलेले स्वत:चे घर कारवाईच्या भीतीने स्वत: सरपंचानेच जेसीबी लावून भुईसपाट केले. ही घटना तालुक्यातील मुधोली चक नं.२ येथे घडली. तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.
मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते. एका व्यक्तीने त्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध ग्रामपंचायतमध्ये नमुना आठची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवकाने सरपंच यांना कळवली. सरपंचाचे घर अतिक्रमणात असल्यास सदस्यत्वच रद्द होईल. परिणाम, सरपंचपदही गमवावे लागेल, ही बाब सरपंचाच्या लक्षात येताच शनिवार, ३१ जुलै रोजी सरपंचांनी आपले घर जेसीबी लावून पाडले.
नियमानुसार अतिक्रमिकांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहता येत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत पदावरून हटविले. त्याच  भीतीने सरपंच अश्विनी कुमरे यांनी आपले घर पाडले.

Web Title: Ansarpanch demolished his own house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.