नक्षलविरोधी शांतता रॅली

By admin | Published: July 29, 2014 11:47 PM2014-07-29T23:47:33+5:302014-07-29T23:47:33+5:30

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली पोलीस स्टेशनच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावर नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली.

Anti-Naxal Silence Rally | नक्षलविरोधी शांतता रॅली

नक्षलविरोधी शांतता रॅली

Next

नागरिकांची उपस्थिती : नक्षल्यांच्या हिंसक घटनेचा केला निषेध
एटापल्ली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली पोलीस स्टेशनच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावर नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली.
नक्षल्यांनी २८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन ठिकठिकाणी बॅनर लावून तसेच पत्रक टाकून केले आहेत. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी कामे बंद ठेवावीत, असेही नक्षल्यांनी पत्रकातून आवाहन केले आहे. नक्षल्यांच्या दहशतीला बळी न पडता नागरिकांनी आपली दैनंदिन कामे सुरळीत पार पाडावी. यासाठी एटापल्ली पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरूवात पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गाने रॅली काढून परत रॅलीचा समारोप पोलीस ठाण्यात करण्यात आला.
या रॅलीदरम्यान नक्षलहिंसक घटनेचा निषेध करून शांततेचा संदेश देण्यात आला. या रॅलीत एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, पोलीस निरिक्षक किरण अवचार, पोलीस उपनिरिक्षक आव्हाड आदीसह पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीदम्यान पोलीस विभागाच्यावतीने फलक तयार करून जनजागृती करण्यात आली. नक्षल सप्ताह पाळू नये, असे आवाहन पोलिसांनी या रॅलीदरम्यान केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी एटापल्ली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले. या रॅलीला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Anti-Naxal Silence Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.