जादूटोणाविरोधी कायद्याचा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:04 PM2018-11-20T12:04:25+5:302018-11-20T12:05:33+5:30
राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे. याबाबतचा ठराव सिनेटच्या सभेत पारित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे. याबाबतचा ठराव सिनेटच्या सभेत पारित करण्यात आला आहे.
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मागणीनुसार जादूटोणाविरोधी कायदा अभ्यासक्रमात शिकविला जावा, असा ठराव सिनेट सदस्य अॅड. गोविंद भेंडारकर यांनी सिनेटच्या सभेमध्ये मांडला.
सिनेटने सकारात्मक निर्णय घेऊन हा कायदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल, असा ठराव पारित केला. सदर ठराव विद्वत्त परिषदेकडे पाठविला जाणार आहे. विद्वत्त परिषदेकडे मान्यता दिल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. पुढील शैक्षणिक सत्रापासून सदर कायदा अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल.