चपराळात दुकाने न लावण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:29+5:302021-03-07T04:33:29+5:30
चपराळाच्या यात्रेत हजारो भाविक येतात. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार २६ फेब्रुवारीपासून मंदिर बंद ...
चपराळाच्या यात्रेत हजारो भाविक येतात. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार २६ फेब्रुवारीपासून मंदिर बंद करण्यात आले आहे. यावर्षी ११ मार्चला महाशिवरात्रीला यात्रा भरणार नाही. भाविकांना घरीच महादेवाची पूजा करावी लागणार आहे. लहान मुलांना मात्र यात्रेची मजा घेता येणार नाही. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री यात्रा भरली होती. त्यानंतर २२ मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन झाले. त्यानंतर नोव्हेंबरपासून लॉकडाऊन काढण्यात आले. नंतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. मात्र, आता पुन्हा फेब्रुवारीपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे यावर्षी महाशिवरात्री यात्रा भरणार नाही. १० ते १४ मार्चपर्यंत मंदिर परिसरात यात्रेसाठी दुकाने लावू नयेत, असे पत्रक देवस्थान कमिटीने काढले आहे.