२६ ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:35 PM2017-09-04T22:35:26+5:302017-09-04T22:36:05+5:30

येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.

Apply 26 Gram Panchayat Code of Conduct | २६ ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू

२६ ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला मतदान : युवा उमेदवारांसाठी सातवी पासची अट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. १६ आॅक्टोबरला निकाल जाहीर होऊन नागरिकांनी निवडलेले सरपंचही जाहीर होतील. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
यावेळी प्रथमच नागरिकांमधून सरपंचाची थेट निवड होणार आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या गटाला मिळते यापेक्षा सरपंच कोणाचा होतो यावर राजकीय पक्ष आपले लक्ष केंद्रीत करणआर आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसली तरी सर्व प्रमुख पक्ष आपल्याच गटाचा किंवा पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी जोमाने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
वर्ष २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन नव्याने प्रभागरचना आणि आरक्षण करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०१७ पर्यंतच्या मूळ मतदार यादीनंतर जुलै महिन्यात नोंदणी झालेल्या नवीन मतदारांचा समावेश करून सुधारित मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील किष्टापूर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम आधीच जाहीर करण्यात आला आहे. आदिवासीबहुल जिल्हा असल्यामुळे बहुतांश जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी करण्याबाबत जागृतीच नसल्यामुळे लोक निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहतात. त्यासाठी शासन स्तरावर चर्चा करून जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे विशेष शिबिर लावण्याची मागणी जोर धरत आहे.
निवडणूक प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा विरोध असला तरी अलिकडे हा विरोध काहीसा सौम्य झाला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी अतिसंवेदनशिल भागातील नागरिक ही पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र त्या भागात निवडणूक यंत्रणेने योग्य प्रकारे जनजागृती करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
अवघ्या ४ ग्रा.पं.साठी दुसरा टप्पा
राज्यभरात आॅक्टोबर ते फेब्रुवारी यादरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. निवडणूक यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणाºया ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत केवळ ३१ ग्रा.पं.च्या निवडणूक लागणार आहे. या सर्व ठिकाणची निवडणूक एकाच टप्प्यात घेणे सहज शक्य होते. परंतू तसे न करता केवळ ४ ग्रामपंचायतींची निवडणूक दुसºया टप्प्यात होणार असल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढणार आहे.
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीला खो
२७ मे २०१७ रोजी झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ४३७ जागांवर कोणीच उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पुढे आले नव्हते. त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम लावता येतो. परंतू शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीला ‘खो’ देण्यात आला आहे. त्यामुळे गावांच्या विकासाचा पाया असणाºया ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांचे प्रशासन किंवा निवडणूक आयोगाला गांभिर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशी असेल पात्रता
सदर निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार जर १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेला असेल तर तो किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ज्या ग्रामपंचायतमध्ये उमेदवार निवडणूक लढणार आहे त्या गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असणे गरजेचे आहे.
इच्छुक उमेदवाराने वयाचे २१ वर्षे पूर्ण केलेले असावे.
१२ सप्टेंबर २००१ नंतर २ पेक्षा अधिक अपत्यांचा जन्म झाला असल्यास ते उमेदवार अपात्र ठरणार आहेत.
उमेदवाला जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. नसल्यास त्यासाठी अर्ज केलेला असावा.
इच्छुक उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आवश्यक आहे.

Web Title: Apply 26 Gram Panchayat Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.