जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा विरोधी पक्षात बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:23 AM2018-02-05T00:23:12+5:302018-02-05T00:23:48+5:30

लोकप्रतिनिधींना पाच वर्ष सेवा केल्यावर पेंशन दिले जाते. तर ३५ वर्ष सेवा देणाºया शासकीय कर्मचारी व शिक्षकांना पेंशन नाकारली जात असेल तर हा त्यांच्यावरील फार मोठा अन्याय आहे. जुनी पेंशन योजना लागू करा अन्यथा विरोधी पक्षात बसण्याची तयारी करा,.....

Apply an old pension, otherwise sit in an opposing party | जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा विरोधी पक्षात बसा

जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा विरोधी पक्षात बसा

googlenewsNext
ठळक मुद्दे चामोर्शीत कार्यक्रम : शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनादरम्यान मान्यवरांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : लोकप्रतिनिधींना पाच वर्ष सेवा केल्यावर पेंशन दिले जाते. तर ३५ वर्ष सेवा देणाºया शासकीय कर्मचारी व शिक्षकांना पेंशन नाकारली जात असेल तर हा त्यांच्यावरील फार मोठा अन्याय आहे. जुनी पेंशन योजना लागू करा अन्यथा विरोधी पक्षात बसण्याची तयारी करा, असा सूर शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनादरम्यान उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केला.
महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेचे चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या प्रांगणात जिल्हा अधिवेशन रविवारी पार पडले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष के. के. वाजपेयी होते. उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. नागो गाणार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष सत्यम चकीनारप, प्राचार्य हिराजी बनपूरकर, उपशिक्षणाधिकारी संजय भिलकर, रवी बोमनवार, प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, दिलीप चलाख, नत्थुजी पाटील, नागपूर विभागाचे मेहेर, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, प्रा. रमेश बारसागडे उपस्थित होते.
आ. नागो गाणार यांनी शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या भ्रष्टाचाराबाबत चिंता व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातील बोगस शिक्षक प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने या प्रकरणातील अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले आहेत. शिक्षण क्षेत्रात अर्थ समजून न घेतलेल्या अधिकारी वर्गाला चौकात फटके मारले पाहिजे. शौैचालयाच्या बांधकामाचा निधी हडप करणाºया शासकीय अधिकाºयांना शिक्षण क्षेत्रावर बोलण्याचा अधिकार नाही. जुनी पेंशन योजना मागच्या सरकारने बंद केली होती. तोच निर्णय विद्यमान सरकारही कायम ठेवणार असेल तर या सरकारलाही घरी बसावे लागेल. राजकारणात शिक्षण चालेल मात्र शिक्षणात राजकारण आणू नये, असे आवाहन आ. नागो गाणार यांनी केले. या जिल्हा अधिवेशनाला जवळपास ४०० शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, अहवाल वाचन कार्यवाह गोपाल मुनघाटे, प्रमोद खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, स्वागताध्यक्ष प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, सत्यम चकीनारप, प्राचार्य बनपूरकर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन सविता सादमवार यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाला खा. अशोक नेते व स्वप्नील वरघंटे यांनी उपस्थित दर्शविली. उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार यांनी मानले.

Web Title: Apply an old pension, otherwise sit in an opposing party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.