मोकाट गुरांच्या शिंगांना रेडियम लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:23+5:302021-07-01T04:25:23+5:30

गडचिराली शहरात २४ तास मोकाट गुरांचा हैदोस असतो. तालुक्यातील ग्रामीण भागातही मोकाट जनावरांची संख्या अधिक आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर ...

Apply radium to the horns of Mokat cattle | मोकाट गुरांच्या शिंगांना रेडियम लावा

मोकाट गुरांच्या शिंगांना रेडियम लावा

googlenewsNext

गडचिराली शहरात २४ तास मोकाट गुरांचा हैदोस असतो. तालुक्यातील ग्रामीण भागातही मोकाट जनावरांची संख्या अधिक आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसले असतात. येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनधारकांना जनावरे स्पष्ट दिसावित यासाठी त्यांच्या शिंगाना रेडियम स्टिकर्स लावण्याची गरज आहे. शहरातील अनेक वॉर्डात तसेच मुख्य चौकातही मोकाट जनावरे सकाळ व सायंकाळच्या सुमारास बसून असतात. परंतु या गुरांना कोंडवाड्यात टाकण्याबाबत प्रशासन उदासीन आहे. परिसरातील जवळपास ९० टक्के गुरे मोकाट आहेत. शेती व बाजार परिसरातील हिरवा चारा जनावरे खातात. त्यानंतर गुरे रस्त्यावर येऊन ठाण मांडतात. त्यांना हाकलून लावले तरी पुन्हा येऊन बसतात. म्हशी तर बसलेली जागासुद्धा सोडत नाही. आजपर्यंत येथे अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. स्थानिक प्रशासन व वाहतूक पोलीस शाखेने पुढाकार घेऊन मोकाट जनावरांच्या शिंगाना रेडियम स्टिकर्स लावावे.

सुधाकर गायकवाड, गडचिराेली

Web Title: Apply radium to the horns of Mokat cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.